जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गणेश विसर्जनास उत्साहात प्रारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते काल आजी आज सकाळपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणेशाला गणेश भक्तांनी वाजतगाजत,”गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” च्या घोषणा देत भर पावसात अखेरचा निरोप देण्यास प्रारंभ झाला होता.त्यावेळी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोपरगाव शहर हद्दीत एकूण ११५ गणेश मूर्ती बसविण्यात आल्या होत्या.अज शहरातील गणेश विसर्जनासाठी कोपरगाव शहरात एकूण ४ पोलीस अधिकारी,४० पोलीस कर्मचारी,३७ गृह रक्षक दलाचे जवान असे एकूण ८१ कर्मचारी कार्यरत आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.यामागची पौराणिक कथा अशी आहे की,”ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली,ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले.१० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे.अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली.जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते,तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता.ज्या दिवशी वेद व्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता.हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.कोपरगाव शहरात आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात अनेक मंडळांनी आपल्या लाडक्या बुद्धीच्या देवतेला निरोप दिला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या बाप्पाला भल्या सकाळी सात वाजताच साग्रसंगीत निरोप दिला असून आदल्या दिवशी उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.

त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने गोदावरी नदीवरील छोटया पुलाजवळ पश्चिम बाजूस गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केलेली दिसून आली आहे.
दरम्यान काल सकाळ पासूनच गणेश विसर्जनास प्रारंभ झाला होता.त्यात सातव्या दिवशी हत्ती गणपती,जय महाकाल गणपती,एस.ए.फाउंडेशन गणपती,माउली प्रतिष्ठान,जनसेवा फाउंडेशन,अंबिका तरुण मंडळ,अजिंक्यराज क्लब,हिंदवी स्वराज मित्र मंडळ,जगदंबा प्रतिष्ठान,विघ्नेश्वर रिक्षा संघटना,सिंधी समाज मंडळ,जय श्रीराम मित्र मंडळ,मोरया प्रतिष्ठान,राजगड मंडळ,एस.पी.संजयनगर,जय बजरंग तरुण मंडळ आदी सतरा मंडळांनी आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला होता.

“कोपरगाव तालुक्यात एकूण ८३ गणपती बसविण्यात आले होते.त्यातील काल २१ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर आज ६२ गणेश मूर्ती विसर्जना जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यासाठी कोपरगाव शहरात एकूण ३ पोलीस अधिकारी,२२ पोलीस कर्मचारी,२२ गृह रक्षक दलाचे जवान असे एकूण ४७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते”-दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.

दरम्यान आज सकाळ पासून मुख्य रस्त्याला गणेश विसर्जनाला रांगा लागल्या होत्या त्यात मुंबादेवी तरुण मंडळ,प्रगत शिवाजी मंडळ,जय तुळजा भवानी तरुण मंडळ,हिंदुवाडा तरुण मंडळ,साई समर्थ प्रतिष्ठान निवारा,विजेता विनायक तरुण मंडळ,सनी ग्रुप,राजमुद्रा प्रतिष्ठान,माता वैष्णवी देवी ग्रुप,धर्मयोद्धा शामभाऊ प्रतिष्ठाण,वक्रतुंड तरुण मंडळ,दत्तनगर मित्र मंडळ,युवा प्रातिष्ठाण, क्रांती युवक संघटना,नवश्या गणपती प्रतिष्ठाण,नरसिंह प्रतिष्ठाण,कहार समाज व भाजी विक्रेता संघ,सराफ बाजार तरुण मंडळ,न्यू यंगस्टार क्लब,हिंदू सम्राट संघटना,कोपरगाव तालुका अटो रिक्षा व टॅक्सी संघटना,संघर्ष तरुण मंडळ,छत्रपती संभाजी चौक मित्र मंडळ,बजरंग चौक मित्र मंडळ,जय श्रीराम मित्र मंडळ,शिवराज प्रतिष्ठाण,जय लक्ष्मी आई भक्त मंडळ,हिंदुराजा तरुण मंडळ,जय श्रीराम मित्र मंडळ,शुक्लेश्वर तरुण मंडळ,छत्रपती प्रतिष्ठाण आदींचा समावेश होता.याखेरीज खाजगी घरातील गणेश मंडळाचा वेगळा तांडा असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

गोदावरीस या वर्षी मोठा पूर असल्याने गणेश मूर्ती संकलन करण्यावर प्रतिकूल परीणाम दिसून आला आहे.मूर्ती संकलनाभावी कर्मचारी दिसत आहे.

“कोपरगाव नगपरिषदेने आपल्या हद्दीत छोटा पूल,मोठा पूल व शुक्राचार्य घाट आदी तीन ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे.त्या ठिकाणी तीन स्वतंत्र निर्माल्य संकलन केंद्रे व १४ वाहने कार्यरत ठेवले आहे.या शिवाय गोदावरी नदीपात्रात गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी अग्निशामक पथक स्वतंत्र पथक कार्यरत ठेवले आहे.गणेश विसर्जनासाठी विजेचे प्रकाश झोत कार्यकर्त ठेवले असून त्यासाठी एकूण कोपरगाव नगरपरिषदेचे २२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

दरम्यान कोपरगाव शहर हद्दीत एकूण ११५ गणेश मूर्ती बसविण्यात आल्या होत्या.अज शहरातील गणेश विसर्जनासाठी कोपरगाव शहरात एकूण ४ पोलीस अधिकारी,४० पोलीस कर्मचारी,३७ गृह रक्षक दलाचे जवान असे एकूण ८१ कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक देसले यांनी शेवटी दिली आहे.दरम्यान कोपरगाव तालुक्यात एकूण ८३ गणपती बसविण्यात आले होते.त्यातील काल २१ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर आज ६२ गणेश मूर्ती विसर्जना जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यासाठी कोपरगाव शहरात एकूण ३ पोलीस अधिकारी,२२ पोलीस कर्मचारी,२२ गृह रक्षक दलाचे जवान असे एकूण ४७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान कोपरगाव नगपरिषदेने आपल्या हद्दीत छोटा पूल,मोठा पूल व शुक्राचार्य घाट आदी तीन ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती.त्या ठिकाणी तीन स्वतंत्र निर्माल्य संकलन केंद्रे व १४ वाहने कार्यरत ठेवले होते.या शिवाय गोदावरी नदीपात्रात गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी अग्निशामक पथक स्वतंत्र पथक कार्यरत ठेवले आहे.गणेश विसर्जनासाठी विजेचे प्रकाश झोत कार्यकर्त ठेवले होते.त्यासाठी एकूण कोपरगाव नगरपरिषदेचे २२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे.

दरम्यान सकाळी ०७ वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पहिला गणपती विसर्जन करण्यात आला असून सर्वात शेवटी निवारा या उपनगरातील साई समर्थ प्रतिष्ठानचा गणपती विसर्जित करण्यात आला आहे.सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्यावर शहर पोलिसांनी या आनंदात सहभागी होऊन नाचण्याचा आंनद लुटला असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close