जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ग्रामसेवकाच्या वादळी’ऑडिओ क्लिप’चा प्रसार,कोपरगाव तालुक्यात खळबळ!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची कथित ऑडिओ क्लीप वर्तमानात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असून ग्रामसेवक भिमराज बागुल आणि ग्रामपंचायत शिपाई यांच्यामधील संभाषण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून या संभाषणात ग्रामसेवक सरपंचावर आक्षेपार्ह भाषेत बोलल्याचे दिसत आहे.तर आता गटविकास अधिकारी यांच्या हातून आपण त्यांची जिरवणार असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येत आहे.त्यामुळे नाटेगाव सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“जुन्या कामावरून विचारणा झाली व ती देण्यास आपण असमर्थ झालो होतो.तथापि शाळेचे काम अंशतः अपूर्ण अवस्थेत होते व त्या ठिकाणी काही शिक्षकानी विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्याचा प्रयत्न केला होता.त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने विद्यार्थी त्याची सफाई करत असल्याने त्यास काही पालकांनी हरकत घेतली होती.त्यावरून वादंग वाढले व काही सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यास राजकीय रंग दिला आहे.आपला त्या क्लिपशी संबंध नाही”-भीमराज बागुल,ग्रामसेवक,नाटेगाव.

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील ग्रामसेवक मगर हे गैरव्यवहारात अडकले असून त्यांच्यावर शिर्डी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन काही महिने उलटूनही अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही.त्यामुळे ग्रामसेवक बेताल वागू लागले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.अशातच याच तालुक्यातील उत्तरेकडील साधारण दहा कि.मी.अंतरावर असलेल्या नाटेगाव येथील ग्रामसेवक वादग्रस्त ठरले आहे.नाटेगावात ३० जुलै रोजी एक ग्रामसभा पार पडली होती.त्यात सदर ग्रामसेवक शिक्षकांना आक्षेपार्ह भाषेत बोलले होते.त्यावरुन गावात दोन तट पडले होते.

सदर ग्रामसभेत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झालेले असून नाटेगाव येथील रहिवासी व कोपरगावात तात्पुरते रहिवासी असलेले ठेकेदार मोरे यांच्या खुर्चीवर बसण्यावरून वाद निर्माण झालेले होते.याच ग्रामसभेत कृषी सहाय्यक,शिक्षक,वीज तंत्री यांचे जाहीर कौतुक झाले (ते कोणी केले याचा उल्लेख आढळत नाही) मात्र ग्रामसेवक यांचेवर टीका झाल्याने सदर ग्रामसेवक दुखावल्याचे सदर ‘ऑडिओ क्लिप’ मध्ये प्रथम दर्शनी ऐकू येताना दिसत आहे.त्यामुळे सदर ग्रामसेवकांची गाडी रुळावरून घसरली असल्याचे दिसत आहे.व त्यांनी आपण ‘दोन क्वाटर’ मारल्याची आपल्या सहकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनींवरून बोलताना कबुली देताना दिसत आहे.त्यावर एका गटाने सदर ग्रामसेवक यांना सदर शिक्षकांची भर ग्रामसभेत माफी मागण्यास भाग पाडले होते.त्यावरून हे रणकंदन घडले होते.
“सरपंच हांडगा आहे,एकटा ग्रामसेवक जबाबदार धरता व इतरांना अंग देता” अध्यक्ष असताना ग्रामसभा चालवता येत नाही,याला दोष माझा आहे का? तू माझ्या जीवाचा माणूस आहे म्हणून मी खेळ करणार आहे.व स्वतःला दोष लावून घेताना दिसत आहे.व शिक्षकांशी कसे वागायचे हे मला सांगायची गरज नाही.माझे सासरे,सासू मुख्याध्यापक आहे.अन्य नातेवाईक शिक्षक आहे. कोळपेवाडी येथे माझे नातेवाईक शिक्षक आहे.धोत्रे येथील नातेवाईक शिक्षक आहे.व मला शिक्षक कोण हे सांगता का ? व मी उद्धट लागेल का ? असा सवाल विचारला आहे.माझा खेळ वेगळा आहे,”आपण आता जे काही करायचे ते स्वतः करणार नाही तर बी.डि.ओ.च्या खांद्यावर बंदूक ठेवुन खेळ करणार असल्याचा दावा केला आहे” हा खेळ नेमका कोणता हा प्रश्न निर्माण झाला आहे.व पुढील बैठकीत मी दारू पिऊन येणार असल्याचेही या संभाषणात ग्रामसेवक म्हणत आहे.दरम्यान समोरची व्यक्ती माझी टाकी भरली आहे मी फोन बंद करतो असे म्हणून फोन कट करतो असे दिसते आहे.

दरम्यान सदर ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना निधी खर्च केल्या बाबतची माहिती देत नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन चौकशी करावी अशी मागणी कोपरगाव पंचायतचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ बाबत ग्रामसेवक भिमराज बागुल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी,” जुन्या कामावरून विचारणा झाली व ती देण्यास आपण असमर्थ झालो होतो.तथापि शाळेचे काम अंशतः अपूर्ण अवस्थेत होते व त्या ठिकाणी काही शिक्षकानी विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्याचा प्रयत्न केला होता.त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने विद्यार्थी त्याची सफाई करत असल्याने त्यास काही पालकांनी हरकत घेतली होती.त्यावरून वादंग वाढले व काही सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यास राजकीय रंग दिला असल्याचे बोलले जात आहे.मात्र आपण दरवाजा आणि खिडकीचे काम झालेले नसल्याने व तांत्रिक दृष्ट्या ते अपूर्ण असल्याने त्यात शाळा भरण्यास नकार दिला होता.त्याचा काही राजकीय कार्यकर्त्याना राग आल्याचे मानले जात आहे.

त्यानंतर एका गटाने राजकीय कारणातून हा वाद वाढविला असल्याचे समजते.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान सदर कथित ऑडिओ क्लिपची पडताळणी झाल्यानंतर ग्रामसेवकावर कारवाई होणार असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close