कोपरगाव तालुका
कोपरगाव फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक फिजिओथेरपी दिनाचे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत फिजिओथेरपी सप्ताह मोठ्या उत्साहात करण्यात आला होता.
‘जागतिक फिजिओथेरपी’ या दिवसाची स्थापना १९५१ मध्ये करण्यात आली.त्यानंतर हा दिवस ८ सप्टेंबर १९९६ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.हा दिवस जागतिक भौतिक चिकित्सा समुदायाची एकता दर्शवितो.या दिवशी फिजिओथेरपिस्टच्या कार्याबाबत जागरूकता वाढवण्याचा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला जातो.कोपरगावात हा दिन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला आहे.
सदर दिवशी या क्षेत्रातील लोकांना आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कौशल्य वाढवणे यावर अधिक भर देण्यात आला आहे.या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गालगत असणाऱ्या कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयात ‘जागतिक फिजिओथेरपी दिन’ साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,प्रसाद कातकडे,दीपक कोटमे,प्रमुख अतिथी हिरालाल महानुभव,संजय कडू,जळगाव कृषी अधिकारी खेडकर सर नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य ईरशाद अली,डॉ.दीपक शर्मा,डॉ.महेंद्र सिंग,प्राजक्ता शिंदे,वैभव शिंदे,मोनेश्वर शिंदे,जयश्री वाघ,प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी भोतिकोउपचार जनजागृती रॅली,”एक ना सूरज,बोलना नीरज,व फिजिओथेरपी ही तर काळाची गरज” अशा घोषणा देऊन वातावरण निर्मिती करण्यात आली होती.हि फेरी कोपरगाव शहरातून काढण्यात आली होती. या रॅलीने सर्व कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेतले.तसेच भौतिक उपचाराची जनजागृती विषयक पदनाट्य सदर करण्यात आले.वास्तव गणेश मंडळ कोपरगाव व वक्रतुंड गणेश मंडळ कोपरगाव अशा विविध ठिकाणी हे पदनाट्य सादर करण्यात आले.तसेच शिक्षक दिनानिमित्त बरेच भाषणे,नाट्य,नृत्य,प्रदर्शित करून शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले होते. या सप्ताहाची शोभा वाढविण्यासाठी फिजिओथेरपी महाविद्यालयातर्गत एक मोफत ‘भौतिकोपचार शिबीर’ आयोजित केले होते.
या शिबिरा मार्फत बऱ्याच गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळाले व भौतिक उपचाराची माहिती देण्यात आली.या पूर्ण सप्ताहात काम करत करतांना कशी काळजी घ्यावी यांची माहिती श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना,संस्थेतील सुरक्षा रक्षक,कामगार,यांना देण्यात आली.या सप्ताहात प्रश्नमंजुषा आणि वाद विवाद स्पर्धा घेण्यात आल्या.