कोपरगाव तालुका
…या गावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील महिला वर्गासाठी पिण्याच्या पाण्याची समस्या किती गंभीर असते व त्यासाठी महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे.ना.आशुतोष काळे यांनी कोळपेवाडीच्या महिलांचा अतिशय महत्वाचा प्रश्न सोडविला असून महीलांप्रती अतिशय संवेदनशील असणारा कर्तबगार लोकप्रतिनिधी कोपरगाव तालुक्याला लाभला असल्याचे गौरोद्गार सिनेअभिनेत्री अलका कुबल काढले यांनी नुकतेच कोळपेवाडी येथे नुकतेच काढले आहे.

“मागील अडीच वर्षात मतदार संघातील जवळपास ६० पेक्षा जास्त गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत २६० कोटी पेक्षा जास्त निधी आणला आहे.व यापुढील काळात देखील उर्वरित गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून भरघोस निधी आणणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावच्या १६.७५ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ नुकताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कचरू कोळपे होते.
सदर प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,वसंतराव आभाळे,श्रीराम राजेभोसले,कारखान्याचे संचालक व कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे,उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,संभाजी काळे,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,पद्मविभूषण शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,शिवाजी वाबळे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे,सुरेगावचे उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, मीनल गवळी,शाखा अभियंता प्रशांत कदम,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”अभिनय क्षेत्रात आपण केलेल्या अनेक भूमिका अजरामर ठरल्या.त्या भूमिकांना न्याय देतांना जीव ओतून काम केले.त्यामुळे आजही ३१ वर्षापूर्वी जे प्रेम रसिक प्रेक्षकांकडून मिळत होते आजही तेवढेच प्रेम मिळत आहे विशेषत ग्रामीण भागातील महिला जरा जास्तच प्रेम करतात याचा मनस्वी आनंद वाटतो.जीवनात चारित्र्य अतिशय महत्वाचे असून महिलांनी आयुष्यभर चारित्र्य जपावे.अभिनय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामातून व चारित्र्य जपले त्यामुळे आदर्श मुलगी,आदर्श पत्नी आणि आदर्श आई होवू शकले.त्यामुळे चारित्र्य जपावे आयुष्यात नेहमीच मानसन्मान मिळेल असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना आ.काळे म्हणाले की,”मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास साधतांना रस्ते,वीज,आरोग्य व पाणी आदी प्रश्नांना प्राधान्य दिले.कोळपेवाडी गावाचा देखील मागील अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी तब्बल १६.७५ कोटी निधी देवून महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.सरकार जरी बदलले तरी विकास कामांसाठी निधीचा ओघ असाच सुरू राहील.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या लगत असणाऱ्या कोळपेवाडी गावाच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.महिला भगिनींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न आमदारकीच्या कारकीर्दीत सोडविता आला ही समाधानाची बाब आहे.महाविकास आघाडी सरकार असतांना मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी जो प्रयत्न आणि पाठपुरावा करीत होतो ते प्रयत्न आणि पाठपुरावा आजही सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे यांनी केले.सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण व भाग्यश्री पिंगळे यांनी केले तर आभार उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे यांनी मानले आहे.