जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

राजस्थानी गोपालकाचा शेतकऱ्यांवर हल्ला,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या गोधेगाव शिवारात शेतकऱ्याच्या शेतीतील मका पिकात आपल्या गायी घालून मका पिकाचे नुकसान करून त्याचा जाब संबंधित शेतकऱ्याने विचारला असता त्यांनाच मारहाण करून एक राजस्थानी गायी-म्हशी सांभाळणारा गवळी फरार झाल्याने त्याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अशोक मारुती रांधवने (वय-६५) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठा संताप व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र.

दि.२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कासली येथील तात्पुरते रहिवासी असलेले गोपालक (तथा गवळी नाव माहिती नाही) हा शेजारच्या शेतात आपल्या गायी-म्हशी घेऊन आला असता त्याच्या गायी व म्हशींनी थेट अशोक रांधवणे यांच्या शेतातील मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.त्याबाबत संबंधित शेतकरी अशोक रांधवणे यांनी त्यास जाब विचारला असता त्यास त्याचा राग आला व त्याने आपल्या हातातील काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यात राजस्थान या उत्तरेतील राज्यातून मोठ्या प्रमाणावर गायी व म्हशीं पालक यांनी डेरा दिला आहे.अलीकडील काळात त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी घेऊन आपले बस्तान बसवले आहे.मात्र ते उपद्रवी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांना आश्रय दिला होता.त्या व्यवसायातून त्यांनी लाखो रुपये कमावले आहे.व हा सर्व पैसा ते आपल्या मातृ राज्यात पाठवत असतात.त्यालाही येथील शेतकऱ्यांनी कधी हरकत घेतली नव्हती मात्र अलीकडील काळात या गोपालकांचा उपद्रव वाढत चालला आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथून उघडकीस आली आहे.

त्याचे झाले असे की,”फिर्यादी शेतकरी अशोक रांधवणे हे आपली तीन एकर शेतीत गट क्रं.२०७/३ मध्ये आपली पत्नी मंगल रांधवणे,आई सावित्रीबाई रांधवणे असे एकत्र राहतात.त्याच्या शेतात मका पीक उभे आहे.ते काढणीला आले आहे.तर शेजारी शेतकरी रमेश नारायण रांधवणे यांनी आपली शेती काही कारणामुळे पडीक ठेवलेली आहे.दि.२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कासली येथील तात्पुरते रहिवासी असलेले गोपालक (तथा गवळी नाव माहिती नाही) हा शेजारच्या शेतात आपल्या गायी-म्हशी घेऊन आला असता त्याच्या गायी व म्हशींनी थेट अशोक रांधवणे यांच्या शेतातील मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.त्याबाबत संबंधित शेतकरी अशोक रांधवणे यांनी त्यास,”तुझ्या गायी म्हशींनी आमची मका खाल्ली आहे”,”तू पाहत होता,”तुला त्या हाकलता आल्या नाही का ? जाब विचारला असता त्यास त्याचा राग आला व त्याने आपल्या हातातील काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले आहे.त्यामुळे आपण जखमी झालो असून आपल्या हाताच्या कोपरावर व हातावर लाठीचा मार लागल्याने त्यातून रक्त निघाले आहे.त्या दरम्यान त्याने आपल्या गायी म्हशी घेऊन धूम ठोकली आहे.या प्रकरणी फिर्यादी रंधवणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.सुरेश आव्हाड,पोलीस नाईक वाखुरे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८४/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०५ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close