जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ऑनलाईन प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी सोय उपलब्ध नाही ही गंभीर बाब-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील ऑनलाईन प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी सोयच उपलब्ध नाही ही गंभीर बाब असून जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर गंभीर विचार करून जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देऊन प्रशासन गतिमान करावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका बैठकीत केले आहे.

सदर प्रसंगी करंजी बु.येथील कार्यकर्त्यांना आ.आशुतोष काळे यांनी स्मशान भूमीच्या मालकीचे कागदपत्र सुपूर्त केले तो क्षण.

कोपरगाव तहसील कार्यालयात मढी,चितळी,करंजी बु. स्मशान भूमी कागदपत्र वितरण व विधानसभा मतदार संघ आढावा बैठक सकाळी ११.३० वाजता तहसीलदार कार्यालयात आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती माजी सभापती पौर्णिमा जगधने,माजी उपसभापती अर्जुन काळे,माजी सदस्य मधुकर टेके,तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,श्रावण आसने,साळुंके,कोपरगाव सहकारी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,रोहिदास होन आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना गतिमान प्रशासनाचा अनुभव व सेवा मिळणे गरजेचे आहे.जनतेला पुरवठा विभागाने नागरिकांना ऑनलाइन सेवा जलद व चांगल्या सेवा,अन्न पुरवायला हवे आहे.नागरिकांना उगीच चकरा मारायला भाग पाडू नका व आर्थिक भुर्दंड देऊ नका अशा सूचना करून भूमी अभिलेख कार्यालयाने आपले काम चोख बजवावे असे आवाहन केले व मतदार संघातील नागरिकांची रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी व प्रशासकीय कामे निकाली काढण्यासाठी निवासी नायब तहसीलदार नेमण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी करणार आहे असेही त्यांनी शेवटी केले आहे.

दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ व शेतकरी यांना योग्य पंचनामे करण्यासाठी व भरपाई देण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक गरजेचे आहे.वर्तमानात कोपरगाव तालुक्यात केवळ पाच जिल्हा परिषद गटात केवळ पाच पर्जन्यमापक असल्याचे जवळके येथील कार्यकर्ते गोरक्षनाथ शिंदे यांनी निदर्शनास आणले आहे.त्यावेळी आपण सभागृहात याबाबत आवाज उठवणार असल्याचे आ.काळे यांनी निदर्शनास आणले आहे.

त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जून काळे यांनी तालुक्यातील विकास कामात काही असामाजिक तत्व विनाकारण अडथळा आणून व्यत्यय आणत असल्याचे व अशा अपप्रवृत्तीस आळा घालणे गरजेचे असल्याची बाब तहसीलदार बोरुडे यांच्या निदर्शनास आणली आहे.त्यांचा रोख बहुधा माहेगाव देशमुख येथील विकास कामाबाबद असल्याचे दिसून आले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने आ.आशितोष काळे यांचा शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे यांनी चालू वर्षी एकूण २८ रस्त्याच्या केसेस दाखल झाल्या असून त्यातील ३०निकाली काढल्याची माहिती दिली आहे तर जलवाहिन्यांच्या ०३ केस दाखल झाल्याची माहीती दिली आहे.

पुरवठा विभागातील स्वस्त धान्य दुकानातील रेशन कार्ड ऑनलाईन होत नसल्याच्या दोन वर्षांपासून तक्रारी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केली आहे.याबाबत बहुसंख्य तक्रारदाराचे मत होते.

मढी येथील ग्रामस्थांनी एका खाजगी क्षेत्रातून रस्ता करून मागितला असता त्याला तहसीलदार बोरुडे यांनी हरकत घेतली व कडेने नकाशावरील रस्ता असेल तरच असा रस्ता देता येतो खाजगी क्षेत्रातून अवैधरित्या रस्ता देता येत नसल्याचे सांगितले मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी खाजगी जमिनीतून रस्ता देण्याची मागणी करू लागले असता त्यांनी अवैध रित्या असा रस्ता देता येणार नसल्याचे सांगितले त्यामुळे या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना गप्प बसण्याची नामुष्की ओढवली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार पुरवठा विभागाचे प्रमुख दीपक भिंगारदिवे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close