कोपरगाव तालुका
..या नेत्याच्या कोरोना मुक्तीसाठी महेश्वरास साकडे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असून ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी कोळपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत महेश्वर चरणी साकडे घालून महाआरती करण्यात आली असल्याची बातमी त्यांच्या प्रसिद्धी विभागानें दिली आहे.
मतदार संघातील विकासासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आ.काळे यांना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.त्यांना चांगले आरोग्य लाभावे व कोरोनातून त्यांची लवकर मुक्तता व्हावी व ते जनसेवेत पुन्हा रुजू व्हावे यासाठी ग्रामदैवत महेश्वर चरणी सामुहिक प्रार्थना करून महाआरती करण्यात आली असल्याची माहिती आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक तथा कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे,उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे,सदस्य ज्ञानेश्वर हाळनोर,महेश कोळपे,गोरक्षनाथ कोळपे,शिवाजी कोळपे,विलास कोळपे,गोरख कोळपे,हनुमान कोळपे,सागर कोळपे,विजय कोळपे,विक्रम कोळपे,सुंदर कोळपे,सोमनाथ कोळपे,विठ्ठल कोळपे, सुरेश जाधव,सचिन कोळपे,लखन जाधव,राहुल कोळपे,रवी कोळपे,ज्ञानेश्वर हाके,प्रथमेश कोळपे, राहुल कुलकर्णी,दत्तू गोंडे,प्रभाकर चांडे,दिगंबर थोरात,विशाल कोळपे,दिलीप शेरमाळे,धर्मा कोळपे,काशिनाथ कोळपे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधव उपस्थित होते.