कोपरगाव तालुका
सेनेची इच्छा असूनही महाआघाडी सरकार भोंगे काढू देणार नाही-..या नेत्याचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवसेनेचे प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच आपले सरकार सत्तेत आले तर आपण भोंगे काढण्याबाबत सूतोवाच केले होते.त्यामुळे सेना त्यास विरोध असण्याचे कारण उरत नाही मात्र वर्तमानात सेनेचे सहकारी पक्ष त्यांना असे करू देणार नाही हे उघड आहे त्यामुळे,”भोंगे काढण्याची सेनेची इच्छा असूनही राज्याचे महाआघाडी सरकार काढू देणार नाही” असा टोला कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच लगावला आहे.
“राज्यात हा गोंधळ सुरु असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीयांनी वेळेत दखल घेऊन मोठ्या प्रमाणांत अवैध-विना परवाना भोंगे-लाऊडस्पीकर काढून टाकण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे.पण महाराष्ट्र शासन बहिरे असल्याने त्यांना जनभावना ऐकू आलेल्या नसाव्यात.बहिऱ्या शासनाला नीट ऐकू जावे यासाठी आता मंत्रालय-मंत्र्यांचे बंगले-जिल्हाधिकारी कार्यालय-तहसील कचेऱ्यांसमोर मोठ्या आवाजात भोंगे लावण्याची वेळ आलेली आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगर परिषद.
राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी ०३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन हिंदु बांधवांना राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकतेच केले आहे.अशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात तणावाचे वातावरण आहे.त्यामुळे भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास ०३ मे नंतर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.अनधिकृत भोंगे,मंदिर,मशिद,गुरुद्वारा,चर्च व इतर धार्मिक स्थळांना ०३ मे पर्यंत भोंग्यासाठी परवानगी घेण्याची मुभा असणार आहे.त्यानंतर मात्र अनधिकृत भोंगे जप्त करण्यात येऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.मशिदींच्या १०० मीटर परिसराच्या आत हनुमान चालिसा पठणास मनाई करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगर अपरिषदेचे माजीमध्यक्ष विजय वहाडणे यांनी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात हा दावा केला आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”राज्यात हा गोंधळ सुरु असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीयांनी वेळेत दखल घेऊन मोठ्या प्रमाणांत अवैध-विना परवाना भोंगे-लाऊडस्पीकर काढून टाकण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे.पण महाराष्ट्र शासन बहिरे असल्याने त्यांना जनभावना ऐकू आलेल्या नसाव्यात.बहिऱ्या शासनाला नीट ऐकू जावे यासाठी आता मंत्रालय-मंत्र्यांचे बंगले-जिल्हाधिकारी कार्यालय-तहसील कचेऱ्यांसमोर मोठ्या आवाजात भोंगे लावण्याची वेळ आलेली आहे.
मस्जिदीसमोर भोंगे लावून सर्वसामान्य हिंदु-मुस्लिमांत तणाव निर्माण करण्यापेक्षा बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शासनाच्या कानाजवळच भोंगे लावणे योग्य होईल असा सल्ला दिला आहे.खरे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात सुद्धा भोंगे हटविलेच पाहिजेत असेच असणार ! असा दावा करून त्यासाठी एक प्रमाण दिले असून त्यात,”स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेवर आलो तर भोंगे त्वरित हटवू” हे आधीच जाहीर केले होते.पण मतांसाठी लाचारी करणारे शासनातील सहकारी पक्ष मुख्यमंत्र्यांना भोंगे काढू देणार नाहीत असा दावा केला आहे.
एकदा कोपरगावात स्व.बाळासाहेब ठाकरेंची सभा चालू असतांनाच भर दुपारी भोंग्यावरून अजान ऐकू आली होती त्यांनी त्यावेळेसच त्यांनी भोंग्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.हे निष्ठावंत शिवसैनिकांना आजही आठवणीत असणार असा दावा केला असून यावर सेनेची गोची केली आहे.त्यावर आता नगर जिल्हा सेना त्यांच्या या वक्तव्यावर काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.