कोपरगाव तालुका
खाजगी रुग्णालये सुरु करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रातिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर समोर आला असताना राज्यातील अनेकांनी शासन आदेश नसताना खाजगी दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता आता तो खाजगी रुग्णालयांना मागे घ्यावा लागणार असून आता खाजगी रुग्णालयांना आपली रुग्णालये सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतेच दिले आहेत.
कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालये त्यांनी स्वतःहून बंद केले होते शासनाने त्यांना असे कोणतेही आदेश दिले नव्हते मात्र आता खाजगी दवाखाने आता सक्तीने सुरु करण्याचे आदेश आज प्राप्त झाले आहेत.ते त्यांनी आता सुरु करावे-योगेश चंद्रे,तहसीलदार कोपरगाव
देशात आजपर्यंत कोरोनामुळे १३ जणांना आपले प्राण गमवावे लागला असून ६४९ जणांना त्याची लागण झाली आहे तर ४२ जण पुन्हा पूर्ववत झाले आहेत.राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रातिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्च पासून राज्यात लागू करून खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली होती. त्या नुसार जिल्ह्यात निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना प्राधिकृत करण्यात आले होते.त्या नुसार जे प्रवासी परदेशातून व देशांतर्गत प्रवास करून आपल्या गावी आले असतील त्यांच्या पासून कोरोनाचा प्रसार रोखणे आवश्यक समजून त्यावर उपाय योजना करणे आवश्यक होते.सद्यस्थितीत कोरोना साथ व इतर उपचारासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये,मेडिकल दुकाने सुरु रहाणे आवश्यक आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला आहे.या बाबत जेष्ठ डॉक्टर राजेश माळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी डोळे व दाताचे डॉक्टर यांनी आपले दवाखाने बंद केले होते आमची रुग्णालये नियमित सुरूच असल्याचा दावा केला आहे.तर डॉ.अजय गर्जे,डॉ.अतिष काळे यांनीही त्यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे.फक्त वेळ ठरवून घेणे महत्वाचे असल्याचे म्हटलेले आहे.
या पूर्वी अनेकांनी आपली रुग्णालयाने स्वच्छेने बंद केली होती.या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी या रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने प्रतिबंधात्मक उपायांसाठी हे रुग्णालये गरजेचे वाटल्याने,नागरिकांची गैरसोय टाळणेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सर्व रुग्णालये तसेच मेडिकल दुकाने दैनंदिन वेळेत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.