जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…त्या खुनातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील भोजडे चौकी येथील रहिवाशी असलेला शिवसेनेचा तालुका उपाध्यक्ष सुरेश गिऱ्हे १५ मार्च रोजी निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यातील ४ आरोपी विविध ठिकाणाहून पकडण्यात नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाला यश आले असून त्यांना कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने येत्या २६ मार्च पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तथापी दोन प्रमुख आरोपी अद्याप फरारी आहे.या गुन्ह्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप यांच्यावर सोपवला होता.त्यांनी विविध ठिकाणी पाच पथके तपासासाठी रवाना केले होते.पोलिसानी गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून चार सराईत आरोपीना जेरबंद केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात आठ वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुणांची वाळूचोरीच्या भानगडीतून सन-२०१२ मध्ये सुरेश गिऱ्हे याचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहारी शिनगर याच्या हत्येत संवत्सर रवी आप्पासाहेब शेटे हा एक आरोपी आहे. त्याने व विजू खर्डे या दोघांनी हि हत्या केल्याची फिर्यादी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत तरुणांच्या शामराव भीमराव गिऱ्हे या पित्याने दाखल केली आहे. या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती.तर त्यातील आरोपी फरार झाले होते.त्यातील एक फरार आरोपी पैकी रवी शेटे आहे.तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.त्यावर अनेक गुन्हे दाखल होते.त्यातून त्याला हद्दपारही केले होते.तो पासून हा आरोपी फरार असून त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिऱ्हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते.व ते एकमेकांच्या जीवावर उठले होते.त्यातून हा सुडाचा प्रवास सुरु झाला होता.

दरम्यान पोलीस आता या आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली आपली हत्यारे कोठे लपवली यासाठी कार्यरत झाला असून घटनेनंतर हे गुन्हेगार घोयगाव नजीक त्यांची स्विफ्ट कार पंक्चर झाल्यानंतर त्यांनी दुसरी गाडी बोलावून घेऊन पलायन केले असल्याचे उघड झाला आहे.व ते औरंगाबाद मार्गे रवाना झाल्याचे उघड झाले आहे.

रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास मयत सुरेश गिऱ्हे याचे भोजडे येथील घरी येऊन रवी आप्पासाहेब शेटे,व विजू खर्डे,अन्य काही इसमानी मारुती स्विफ्ट कार व विना क्रमांकाची काळ्या रंगाची पल्सर या साधनांचा वापर करून अंदाधुंद गोळीबार करून सुरेश गिऱ्हे याच्या दिशेने गोळीबार केला तो जीव वाचविण्यासाठी घरामागे पळत असताना मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याचेवर गावठी कट्टयाने गोळीबार करून हातातील कोयत्याने तोंडावर,शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर वार करून त्यास निर्घुन जीवे ठार मारून फरार झाला होते.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती.

या घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप यांच्यावर सोपवला होता.त्यांनी विविध ठिकाणी पाच पथके तपासासाठी रवाना केले होते.पोलिसानी गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून चार आरोपीना जेरबंद केले आहे.त्यात नितीन सुधाकर अवचिते रा. तळेगाव स्टेशन ता.मावळ,शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा पिंप्री चिंचवड ता.हवेली जि. पुणे,मूळ रा.गारखेडा इंदिरानगर ता.जि. औरंगाबाद,रामदास माधव वलटे रा.लौकी ता.कोपरगाव.आकाश मोहन गिरी रा.खराबवाडी चाकण ता.खेड जि. पुणे आदींना विविध ठिकाणाहून अटक करून आज दुपारी कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता चौकशीसाठी पोलिसानी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.तथापि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने येत्या २६ मार्च पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close