जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर कार्य सिद्धीस जाते-…या महाराजांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

माणसाजवळ ध्येय,आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम तो तडीस जाते हे राजेश परजणे यांनी आपल्या कृतीशील वृत्तीतून सिध्द करुन दाखविले असून गावाचा विकास काय असतो तो संवत्सर परिसरात आल्यानंतर लक्षात येते असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले आहे.

“आपण राजकारणात येण्यासाठी स्व.नामदेवराव परजणे यांचा आपल्याला विरोध होता.परंतु त्यांची सामाजिक वाटचाल खंडीत होऊ नये म्हणून आपण राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.जनतेची साथ मिळाल्याने तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली”-राजेश परजणे,माजी जिल्हा परिषद सदस्य.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाचा राजेश परजणे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला असून सदस्यपदाच्या कालखंडामध्ये विविध विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्या रपसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुलोचना ढेपले या होत्या.

सदर कार्यक्रमास खंडू फेपाळे,निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र लोखंडे,दिलीपराव ढेपले,चंद्रकांत लोखंडे,सोमनाथ निरगुडे,भरत बोरनारे,ज्ञानदेव कासार,लक्ष्मणराव परजणे,सूर्यभान परजणे, बाळासाहेब दहे,केशवराव भाकरे,बापू गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,नामदेवराव पावडे, संभाजीराव आगवन,अनिल आचारी,संतोष भोसले,विजय आगवन,रमेश बोरनारे,दत्तात्रय परजणे, बाबुराव मैद,डॉ.घोरपडे,मुख्याद्यापक फैय्याज पठाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्त उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची उकल करुन त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत हा ध्यास स्व. नामदेवराव परजणे यांनी सतत अंगी बाळगलेला होता.आज संवत्सर परिसरात जी विकासाची मंदिरे उभी आहेत, त्यासाठी स्व.परजणे यांनी भक्कम पाया निर्माण करून ठेवलेला आहे.आज याच मंदिरांवर राजेश परजणे यांनी विकास कामांच्या माध्यमातून कळस चढविला आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती, राज्य व केंद्र सरकारच्या अनेक लाभकारक योजना आपल्या गटात राबवून सर्वसामान्य लोकांना त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या असे सांगून रमेशगिरी महाराज यांनी परजणे यांच्या कार्याचे कौतुक केले.स्पस्टवक्तेपणा आणि अविश्रांत परिश्रम या दोन गुणांमुळे राजेश परजणे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती व प्रशासनामध्ये आपली वेगळीच छाप निर्माण करून ठेवलेली आहे.जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा आणि सर्वात जास्त कामे मिळविणारा सदस्य म्हणून आज त्यांची ओळख आहे.कामांचा पाठपुरावा कसा करावा व ते काम तडीस कसे न्यावे हे श्री परजणे यांच्या कृतीशील वृत्तीतून शिकण्यासारखे असल्याचे शेवटी सांगितले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसरपंच विवेक परजणे यांनी केले तर ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,रणशूर सर यांनीही मनोगते व्यक्त केलीत.
त्यावेळी महंत रमेशगिरी महाराज यांची राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल तर योगीता पवार यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी उपस्थितांचे आभार खंडू फेफाळे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close