जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील शासकीय इमारतींचे वेळेत काम पूर्ण करा-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध शासकीय इमारतींचे काम करतांना गुणवत्ता सांभाळून वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावातील एका कार्यक्रमात बोलताना दिल्या आहे.


सन-२०१४ सालामध्ये बांधण्यात आलेल्या कोपरगाव शहरातील तालुका पशु लघुचिकित्सालयाच्या संरक्षक भिंतीच्या ५६ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगूले, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजीमेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, फकीर कुरेशी, रमेश गवळी, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, राहुल देवळालीकर, निखिल डांगे, रवींद्र चिंचपुरे, चंद्रशेखर म्हस्के, दिनेश पवार, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे नितीन शिंदे, दिनकर खरे, अॅड. रावसाहेब जपे, अॅड. विद्यासागर शिंदे, अॅड. शंतनू धोर्डे, अॅड. बाळासाहेब कडू, अॅड. टेके, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिरीष लोहकणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता प्रशांत वाकचौरे, अभियंता स्वप्नील डहाळे, काकासाहेब शिंदे, उपअभियंता विजय भंगाळे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी,ठेकेदार गोविंद मालाणी, कुणाल सोनवणे,आरेखक शीतल भुतडा, भूषण बागुल,डॉ. पी.वाय.ओहोळ, डॉ. एस.एम. काटे, सी.एस. होन, श्रीमती वाघमारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी त्यानी पशु लघुचिकित्सालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. भूमिपूजन कार्यक्रमानंतर आ. आशुतोष काळे यांनी आपला मोर्चा कोपरगाव शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या शासकीय इमारतींच्या बांधकामाकडे वळवून या इमारतींच्या बांधकामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. कोपरगाव शहरात सुरु असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची तसेच नगरपालिका इमारत, पोलीस स्टेशन इमारत, बस स्थानक इमारतीच्या कामाची पाहणी करून बस स्थानकामध्ये व्यापारी संकुल उभारण्यासाठी माहिती घेतली. सर्व इमारतीच्या कामाची पाहणी करतांना आ.आशुतोष काळे यांनी सदर इमारतीमध्ये करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत माहिती घेवून सर्व इमारतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या ठेकेदारांना सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close