जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सराईत गुन्हेगार तालुका पोलिसांच्या ताब्यात

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी कैलास देवराम कोळपे यांच्यावर दरोडा टाकून त्यांस लोखंडी रॉड व काठ्यांनी जबर मारहाण करून त्या कडील ५ हजार रुपये रोख,भ्रमणध्वनी, आदी ऐवज पळवला होता.तो ३ ऑगष्ट २०१८ पासून फरार झाला होता.त्याला नाशिक जिल्ह्यातील येवला पोलिसानी एका गुन्ह्यात अटक केली होती व त्याची रवानगी नाशिक केंद्रीय कारागृहात केली होती.तो २८ मार्च २०१९ पासून कारागृहातच होता.सेंट्रल येथील चोरीच्या गुन्ह्यातील सात पैकी एक आरोपी असलेला अक्षय उर्फ आकाश रंगनाथ लोखंडे रा.तीनचारी कोकमठाण यास कोपरगाव तालुका पोलिसानी नुकताच नाशिकरोड येथील कारागृहातून ताब्यात घेतला आहे.तो सराईत गुन्हेगार असून त्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर सुरेगाव हद्दीतील गु.र.नं.९९/२०१८ भा.द.वि.कलम ३९७,१४३,१४७,१४८,१४९ अन्वये गुन्हा दाखल आहे.या दरोड्याचा गुंह्यातील सात आरोपी पैकी एक मयत झाला देवा लोखंडे हा अद्याप फरार झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close