जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिलांनी यशस्वी उद्योजिका व्हावे-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी गोदाकाठ महोत्सव सुरु करून भक्कम आधार दिला आहे. बचत गटाच्या महिलांसाठी सातत्याने मार्गदर्शनपर शिबीर घेवून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाणार असून महिलांमध्ये गृहउद्योग करण्याची चिकाटी असून आजपर्यंत घेतलेले कर्ज ज्याप्रमाणे नियमित फेडले त्याप्रमाणे यापुढे मोठी कर्ज घेवून महिलांनी स्वउद्योग सुरु करावे व आदर्श गृहिणी बरोबरच यशस्वी उद्योजिका व्हावे असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना पुष्पाताई काळे यांच्या हस्ते यांच्या हस्ते २७ लाख ६१ हजार रुपयांचे कर्जवाटपाचे धनादेश देण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा शिलेदार,वर्षा गंगूले,माधवी वाकचौरे आदींसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

या प्रसंगी बोलतांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे म्हणाल्या की, कोपरगाव तालुक्याच्या बचत गटातील महिलांच्या मागे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाची ताकद उभी करून महिलांमध्ये कोणत्याही संकटावर मात करण्याची उर्जा निर्माण झाली आहे. बचत गटाच्या महिलांनी केल्या जाणाऱ्या अर्थपुरवठ्यातून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ करून आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले. यावेळी साई ओम महिला बचत गट, अष्टविनायक महिला बचत गट, रोझ महिला बचत गट, साई सुमन महिला बचत गट,समर महिला बचत गट,ज्ञानेश्वरी महिला बचत गट,लक्ष्मी महिला बचत गट, विद्यावाहिनी महिला बचत गट, सदाफुली महिला बचत गट, भीमाशंकर महिला बचत गट, साई राम महिला बचत गट, ओंकारेश्वर महिला बचत गट, सुरभी महिला बचत गट, जय श्रीराम महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गट , साई लीला महिला बचत गट, वूमन पॉवर महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट आदी बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाख ऐंशी हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा शिलेदार,वर्षा गंगूले,माधवी वाकचौरे आदींसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close