कोपरगाव तालुका
सर्वच घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प –आ.काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून मोठा दिलासा दिलेला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय व दोन लाखाच्या पुढे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना न्याय देणारा आहे.
राज्यातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलून बेरोजगारांसाठी आशेचा किरण आहे. आरोग्य,शिक्षण यावर भर देवून शेतकरी, महिला व युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौरपंप देण्याचा निर्णय, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात देण्यात येणारा निधी, ग्रामीण रस्त्यांसाठी निधीची उपलब्धता करून प्रत्येक गावात राज्य परिवहन मंडळाची बस येणार असल्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी सर्वच घटकांना न्याय दिला असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.