जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील…या स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गडकिल्यावर स्वच्छता अभियान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १९ फेब्रुवारी हा दिवस शिव जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून या वर्षी पहिल्यांदाच समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येवला तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या अंकाई या किल्ल्यावर जाऊन तेथे स्वच्छता अभियान राबवुन वृक्षारोपण करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.

मनमाड नजीक असलेला अंकाई किल्ला सुमारे एक हजार वर्षांपूर्वी बांधला गेल्याचे इतिहासात माहिती मिळते.किल्ला देवगिरीच्या यादवाने बांधला होता.वर्तमानात यावर पर्यटकांची मोठी वर्दळ असून ते या ठिकाणी कचरा निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.त्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय शिवजयंती निमित्त समता स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला होता.

अंकाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.अंकाई किल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या दोन स्तरांवर पसरलेल्या आहेत. खालच्या स्तरावर दोन गुहा आहेत,त्यापैकी एकही मूर्ती नाही.वरच्या स्तरावर पाच गुहा आहेत ज्यात महावीर मूर्ती चांगल्या स्थितीत आहेत.तोडफोड टाळण्यासाठी ते रात्री लॉक आणि चावीने सुरक्षित असतात.मुख्य गुहेत यक्ष,इंद्राणी,कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला किल्ला अंकाई सुमारे एक हजार वर्षांपूर्वी बांधला गेल्याचे चित्रण करतो.किल्ला देवगिरीच्या यादवाने बांधला होता.वर्तमानात यावर पर्यटकांची मोठी वर्दळ असून ते या ठिकाणी कचरा निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.त्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय शिवजयंती निमित्त समता स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला होता.

समताच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा,त्यांची शिकवण,तत्व,विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत तसेच शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे हा उद्देश प्रामुख्याने या उपक्रमामागे होता.समताच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम इतरांनाही दिशादर्शक ठरणार आहे.या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ऐतिहासिक किल्ले,वास्तू आदींचे संवर्धन होणार असून भविष्यात निर्माण होणाऱ्या अस्मानी संकटांपासून सुरक्षितता मिळणार असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे यांनी दिली आहे.

अंकाई किल्यावर राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान व वृक्षारोपण या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.समता स्कूलने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे आगळे-वेगळे उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली.विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन व उपप्राचार्य समीर अत्तार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.उपक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close