जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याच्या विजेचा प्रश्न मार्गी लावा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.सबस्टेशनला तातडीने जोडण्याची ग्वाही उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी दिली असून कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांना उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या आहेत.

“कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.सबस्टेशनला तातडीने जोडण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील १३२ के.व्ही.सबस्टेशनवर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील काही वर्षापासून निर्माण झालेला वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना कार्यस्थळावर महावितरण व महापारेषणच्या सबंधित आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे,सुनील शिंदे,हरीभाऊ शिंदे,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,राजेंद्र मेहेरखांब,मिननाथ बारगळ,आनंदराव चव्हाण,विठ्ठलराव आसने,सर्जेराव कोकाटे,अशोकराव काळे,काकासाहेब जावळे,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,महानंदाचे माजी संचालक राजेंद्र जाधव,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे,कार्यकारी अभियंता अनिल थोरात,उपकार्यकरी अभियंता भूषण आचारी,डी.डी.पाटील,भगवंत खराटे आदींसह कोपरगाव मतदार संघातील सर्व सहाय्यक अभियंता व शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत ना.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विजेच्या समस्या उपस्थित करून कोपरगाव शहरातील सबस्टेशनवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे ऊर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.शहा येथील १३२ के. व्ही.सबस्टेशन वरून कोळपेवाडी, पोहेगाव, चास नळी या सबस्टेशनला जोडण्यासाठी ४८.०६ किलोमीटर वीजवाहिनी टाकण्याची निविदा प्रसिद्ध झाली असून अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.तसेच धामोरी व चांदेकसारे येथील सबस्टेशन ए. सी.एफ.योजनेंतर्गत बसविणे.मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफार्मरचे प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे दाखल केलेले आहेत त्यांना मंजुरी मिळावी.वारी आणि रवंदे सबस्टेशनची क्षमता वाढवावी.वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने ट्रान्सफार्मर मिळावे.नादुरुस्त ट्रान्सफार्मर वेळेवर मिळावे.कोपरगाव शहरात वीजवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात अडचणी येत असल्यामुळे शहरातील वीजवाहिन्या स्थलांतरीत कराव्या अशा अनेक मागण्या ना. काळे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे यावेळी केल्या आहेत.
त्याबाबत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोपरगाव तालुक्याच्या विजेचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी ३३ के.व्ही.सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनला लवकारात लवकर जोडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कोकमठाण,शिंगवे आणि खिर्डी गणेश या सबस्टेशनला ५ एम.व्ही.ए.चे पॉवर ट्रान्सफार्मर बसविणार,सबस्टेशनवर कोपरगाव तालुक्याच्या मागणीनुसार सबस्टेशनची निर्मिती करा व भविष्यातील गरज ओळखून अतिरिक्त सबस्टेशन उभारा.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. कर्मचारी कशी सेवा देतात यावर अधिकारी व त्या विभागाची प्रतिमा तयार होत असते त्यामुळे पायाभूत सुविधांवर भर देवून वीजग्राहकांना चांगली सेवा द्या.तारतंत्री हे त्या त्या गावातच थांबले पाहिजे याची काळजी घ्या.जे कामचुकार कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करा.भविष्यात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या विजेच्या प्रश्नाबाबत माझ्याकडे तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या. कोळशाच्या टंचाईमुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा १० तासावरून आठ तास करण्यात आला होता त्याबाबत माहिती घेवून पुन्हा कृषी पंपासाठी १० तास वीजपुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close