कोपरगाव शहर वृत्त
… ते गौण खनिज शहरातील रस्त्यांसाठी वापरा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नव्याने होत असलेल्या साठवण तलाव क्रमांक पाचच्या कामाचे निघणाऱ्या दगड-मुरुमाचा वापर शहरातील नादुरुस्त रस्त्यांसाठी वापरावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
“काम मागील साठवण तलाव क्रं.५ चे काम पंधरवड्यात सुरु झाले आहे.त्या ठिकाणी तलावाचा आकार मोठा असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर दगड-माती,मुरूम आदी गौण खनिज निघत आहे.सदर गौण खनिज कोठे टाकायचे हा प्रश्न संबंधित ठेकेदारापुढे असताना कोपरगाव नगरपरिषदेने सदर गौण खनिजांचा वापर कोपरगाव शहरातील पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी करावा परिणाम स्वरूप नगरपरिषदेवरील आर्थिक भार कमी होणार आहे”-सुनील गंगूले,शहराध्यक्ष कोपरगाव शहर राष्ट्रवादी.
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत’ १३१.२४ कोटी रुपये खर्चाला दि.२५ मार्च २०२२ रोजी आ.आशुतोष काळे व शहरातील स्थानिक कार्यकर्ते संजय काळे,राजेश मंटाला आदींनी प्रयत्न करून आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली होती.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.मात्र या योजनेला मंजुरी मिळून सदर कामाची निविदा प्रसिद्ध होऊन ते काम मागील पंधरवड्यात सुरु झाले आहे.त्या ठिकाणी तलावाचा आकार मोठा असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर दगड-माती,मुरूम आदी गौण खनिज निघत आहे.सदर गौण खनिज कोठे टाकायचे हा प्रश्न संबंधित ठेकेदारापुढे असताना कोपरगाव नगरपरिषदेने सदर गौण खनिजांचा वापर कोपरगाव शहरातील पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी करावा परिणाम स्वरूप नगरपरिषदेवरील आर्थिक भार कमी होणार आहे.व शहरातील नादूरुस्त रस्ते दुरुस्त होणार आहे.अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.सदर प्रसंगी त्यांचे निवेदन उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकने यांनी स्वीकारले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरपरिषद माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक कृष्णा आढाव,दिनकर खरे,युवकांचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,रमेश गवळी,वैभव आढाव,श्री डागा आदी मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.