जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी पकडली

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात ब्राम्हण नाल्यानजीक दरोड्याचा तयारीत असलेली टोळी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिसांना आढळून आली असून त्यांच्यावर छापा टाकून भुरज्या उर्फ अर्जुन गोपाल पिंपळे (वय-२०)रा.मोतीनगर सुरेगाव ता.कोपरगाव या सह नऊ जन्य टोळीत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील सात जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत अशी माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.कोपरगाव तालुक्यात वर्तमानात रास्ता लुटीच्या घटनात मोठी वाढ झालीय असून या घटनांनी कोपरगाव व तालुक्यात भीतीचेवातावरण पसरले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिसानी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवली असून चोरांच्या पाळतीवर पोलीस प्रशासन आहे.दरम्यान मंगळवारी रात्री कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आपल्या गस्तीवर असताना त्यांना वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत वेळापूर ते चास नळी रस्त्यावर ब्राम्हण नाल्याजवळ काही संशयित तरुण आढळून आले.त्यांना पोलिसानी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील भुरज्या पिंपळे, शरद गोटीराम फुलारे (वय-२२) रा.पोहेगाव.जानू उर्फ अनिल ओपीन पिंपळे,हे तिघे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत तर.संतोष मुन्शी चव्हाण, शरद ओपीन पिंपळे,तोलाराम उर्फ राजू विठ्ठल पिंपळे,बाबू बाबडी पिंपळे, ताईमाई ताराचंद काळे.सर्व रा.मोतीनगर सुरेगाव किरण छगन सोनवणे,रा.दत्तनगर कोपरगाव हे सात जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.दरम्यान तालुका पोलिसानी त्यांच्याकडून लोखंडी कोयता, लाकडी दांडा, मिरची पावडर, दोरी, विना क्रमांकाच्या दुचाकी असा ६० हजार १३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पळून जाणाऱ्या दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचा विश्वास पोलिसानी व्यक्त केला आहे.तात्यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न. ४१/२०२० भा.द.वि. कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close