जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रवरा पाठोपाठ अशोकचा तोटा सर्वाधिक हे पाप कोणाचे-सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

अशोक सहकारी साखर कारखान्याचा तोटा राज्यातील सर्वाधिक मोठा तोटा असलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या पाठोपाठ ४५० कोटी रुपयांचा असून याचे पाप नेमके कोणाचे असा तिखट सवाल जेष्ठ कार्यकर्ते सुरेश ताके यांनी पोखर,भेर्दापुर येथे बोलताना केला आहे.

सदर प्रसंगी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला असून त्याचे पत्र जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,तालुकाध्यक्ष अड.पांडुरंग औताडे यांनी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अड.अजित काळे यांचेकडे सोपवले आहे.त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक,व त्यांचे सहकारी उपस्थिहोते.

श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,प्रहार संघटना यांच्या पाठिंब्याने सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे रान उठवले आहे.त्यामुळे या प्रचार सभा आता अंतिम चरणात आल्या आहे.त्यासाठी नुकतेच भोकर येथे सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास प्रचार बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते पांडुरंग काळे हे होते.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड.अजित काळे,प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस अविनाश आदिक,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,श्रीरामपूर नगरपरिषद अध्यक्षा अनुराधा आदिक,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,तालुकाध्यक्ष अड.पांडुरंग औताडे,अड.सर्जेराव घोडे,उमेदवार वंदना मुरकुटे,अर्चना उंडे,अर्चना पानसरे,दिलीप पवार,विष्णू खंडांगळे,युवराज जगताप,नितीन पटारे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,शरद निवृत्ती पवार,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक हि शेतकरी हितासाठी लढवली जात आहे.इथेनॉल निर्मिती केवळ ३०हजार प्रतिदिन होत असताना ती ४०हजार लिटर सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.कारखाना प्रतिदिन केवळ ०२हजार ८०० टन गाळप होत असताना ते ०४ हजार ५०० टन सांगून जनतेला वेड्यात काढण्याचे काम राजरोस पणे तमाशातील सोंगाड्यासारखे सुरू आहे.हा कारखाना शेतकरी सभासद यांची कामधेनू आहे याचा यांना विसर पडला आहे.कारखान्याचे गाळप क्षमता वाढवली असती तर शेतकऱ्यांच्या श्रमाने पिकवलेल्या उसाच्या खोडक्या झाल्या नसत्या.येथील ऊस बाहेरील कारखान्यांना पाठवून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे.यांचा अहवाल पाहिला तर पहिली दहा पाने तोट्याचीच असल्याची टीका करून त्यांनी उपस्थित सभासदांना कप-बशीला शिक्का मारण्याचे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे उमेदवार नितीन पटारे यांनी आमचा ऊस कारखान्यापासून केवळ दोन ते तीन कि.मी.असताना सुद्धा ऊस तोड येत नाही.सोळा महिने उलटूनही तो नेला जात नाही.शेतकरी वैतागून तो लवकर नेण्यासाठी शेतकरो पेटवून देतात.त्यातून प्रती टन चारशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.उसाचे वजन घटते.तो वेगळा तोटा पदरात घ्यावा लागतो.त्यातून शेतकरी वैतागून व पाणी भरूनच वाट लागून जाते.यावर आता पर्याय देण्याची वेळ आली आहे.उसास वाढे न राहिल्याने ऊसतोड कामगारांना लवकर तोडण्यासाठी वेगळा प्रसाद द्यावा लागतो.उशीर झाल्याने त्या उसास वाढे रहात नाही.हे ऊसतोड कामगार शेतकरी असल्याने शेवटी त्यांना आपल्या घरी जाण्याची घाई असते.त्यांचे मन वळवणे अवघड बनते.ही पिळवणूक थांबविण्यासाठी ही निवडणूक असून तुम्ही या मताचे दान दिल्यास या वेदनातून शेतकऱ्यांची सुटका होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक प्रा.अड.सलालकर,यांनी केले तर उपस्थितांना उपाध्यक्ष अड.अजित काळे,प्रदेश सचिव अविनाश आदिक,यानंतर शिवाजीराव नांदखिले,प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,कैलास बोर्डे,अड.औताडे,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक,व त्यांचे सहकारी उपस्थित होते.आहे.सूत्रसंचलन युवराज जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार सभेचे आयोजक बाबासाहेब पटारे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close