कोपरगाव तालुका
पालकांनी मुलांना मोबाईल ऐवजी पुस्तके हाती द्यावी-कळमकर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पालकांनी आधुनिक युगात आता आपल्या पाल्यांना हातात मोबाईल देण्याऐवजी पुस्तके देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लेखक संजय कळमकर यांनी शिरसगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नुकतेच स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.या स्नेहसंमेलना प्रसंगी पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,गुरुदत्त स्कूलचे संस्थापक केशवराव भवर,सुनीता भवर, प्राचार्य दिपक चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ भागवत, अशोक गायकवाड,शिवाजी जाधव, अमोल गायकवाड,सर्व शिक्षकवृंद, पालक, व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,आपल्या सारख्या गरीब घरातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी शहरात जावे लागत होते. पण आता शिरसगाव सारख्या खेडे गावात अतिशय कमी फी भरून योग्य शिक्षण मिळते.ही आपल्या मुलांना एक सुवर्णसंधी आहे.