कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील दळण वळण सुविधा सुधारणार-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रस्त्यांना मोठ्याप्रमाणावर निधी आणला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने ज्याप्रमाणे रस्त्यांचा विकास होणे महत्वाचे आहे. या मार्गांवर असलेल्या अनेक लहानमोठ्या पुलांचा विकास होणे गरजेचे असल्यामुळे तालुक्यातील दळणवळण सुविधा सुधारणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी येथे १ कोटी ४४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव-पढेगाव-वैजापूर रस्ता रा.मा. ६५ वर लघु पुलाचे बांधकाम करणे व उक्कडगाव येथे ८ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कैलास निकम घर ते देविदास निकम घर रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,कारभारी आगवन,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सांडूभाई पठाण, नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम,बबनराव गाढे,शिवाजी शेळके,राजेंद्र मोरे,पुंडलिक चक्के,ज्ञानेश्वर निकम, बाळासाहेब टूपके, पोपटराव शिंदे, दत्तात्रय शिंदे, दादासाहेब त्रिभुवन, रवींद्र निकम, संदीप निकम, रमेश पोटे, विठ्ठल गाढे, उत्तमराव निकम, हिरामण गुंजाळ, राहुल जगधने, आंबाऋषी निकम, सचिन निकम, अंबादास निकम, धोंडूराम निकम, अण्णासाहेब निकम, सिताराम निकम, नवनाथ निकम, राजेंद्र निकम, काकासाहेब निकम, दिपक चव्हाण, राहुल निकम, सुभाष निकम, अर्जुनजी त्रिभुवन, दादासाहेब त्रिभुवन, अखिलेश भाकरे, केशवराव गायकवाड, शोएब पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता गुंजाळ, विस्तार अधिकारी डी.ओ. राणमाळ, ग्रामसेवक मेहरे, काटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.