कोपरगाव तालुका
कोपरगावात माजीं पंतप्रधान वाजपेयी यांचा जन्मदिन उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य वीर सावरकर चौकात कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
स्व.अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते.त्यांचा जन्मदिन नगराध्यक्ष वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगावात साजरा करण्यात आला आहे.
अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.त्यांचा आज जन्मदिन होता तो कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,टेकचंद खुबानी,सतीश कृष्णांनी,प्रभाकर वाणी,प्रकाश सवाई,विजय बडजते, मुकुंद काळ कुंद्री, सुभाष दवंगे,विनायक गायकवाड,वसंत जाधव,संजय कांबळे,संदीप गवळी,गणेश शिंदे,किरण थोरात,सुरेश कांगुणे,कैलास निकम,योगेश वाणी आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.