कोपरगाव तालुका
पेपर न दाखवल्याच्या कारणावरून चॉपरणे मारहाण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुलचंदजी विद्यालय्याच्या प्रांगणात पेपर न दाखवल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलगा साद शफीक शेख (वय-१४) यास आरोपी जय तुळशीदास लाहिरे या सह आठ जणांनी चॉपरच्या साह्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे हे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयात सध्या नववीच्या वर्गाच्या चाचणी परीक्षा सुरु असून आज सकाळी पेपर संपल्या नंतर साडे आठ वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्यांचा पेपर संपल्यावर फिर्यादी मुलगा साद शेख याने परिक्षेच्या दरम्यान पेपर न दाखवल्याच्या राग येऊन आरोपी विद्यार्थी जय तुळशीदास लहिरे यास राग आला व त्याने आपल्या मित्रांना बोलावून व स्वतः चॉपरच्या साहाय्याने डोक्यावर मागील बाजूने हल्ला करून गंभीर जखमी केला आहे.तर बाकीच्यांनी त्याला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास साथ दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.३३/२०२०भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे आरोपी जय लहीरे सह यश सचिन शिंदे,कृष्ण संतोष वाणी, वृषीकेश लक्ष्मण त्रिभुवन, यश सुनील जाधव, ओम किरण पराडेरा, गौरव सुभाष पंडोरे, अभिषेक कैलास मंजुळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.