जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..तुमच्याकडे पाहून घेईन-माजी नगराध्यक्षांनी तहसीलदारांना भरला दम !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे उच्च न्यायालयाशी संबंधित महत्वाचे काम चालू असल्याने त्यांनी काल दुपारी दोनच्या सुमारास भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीगाठी काही काळ बंद ठेवल्याचा राग येऊन कोपरगाव नगरपरिषदेचे एक माजी नगराध्यक्ष असलेल्या इसमाने तहसीलदारांना चक्क “…तुमच्याकडे पाहून घेईन” चा दम भरल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,” काल दुपारी आपले एक उच्च न्यायालयाशी संबंधित काम सुरु होते त्यातून काही लोकांचा भेटीगाठी बाबत गैरसमज झाला असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.मात्र ती व्यक्ती कोण हे सांगण्यास असमर्थता दर्शवली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगावच्या तहसीलदार पदी गत वर्षी योगेश चंद्रे यांची नियुक्ती झाल्यापासून तालुक्यातील बऱ्यात कामांचा निपटारा त्यांनी केल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात ते सकाळी आपल्या कार्यालयात लवकर येऊन तब्बल बारा-तेरा तास काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.शिवाय भ्रष्टाचार करणाऱ्यांचा त्यांना बऱ्याच प्रमाणावर त्यांना तिटकारा आहे.असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे.त्यामुळे भ्रष्टाचाराला बऱ्याच प्रमाणात सोकावलेलें अनेक कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसलेली आहे.त्यांनी शिव रस्ते,पांदण रस्ते,रस्त्यांचे वाद,दिवाणी दावे, त्यांच्याकडील सुनावण्या आदींसह नियमित कामांना गती दिली आहे.त्यामुळे यापूर्वीचे तहसीलदार राहुल जाधव यांची आठवण घेण्यालायक अधिकारी बऱ्याच दिवसांनी कोपरगावच्या नागरिकांना मिळाला आहे.म्हणून सर्वच अधिकारी कर्मचारी सरळ झाले व रामराज्य आले असे म्हणता येणार नाही.मात्र तरीही कोपरगाव तहसील कार्यालयात या पूर्वी निर्माण झालेली बेदिली बऱ्याच प्रमाणात कमी झाली असे म्हणण्यास जागा निर्माण झाली असताना काल दुपारी दोनच्या सुमारास कोपरगावात आपल्या घराण्यात दोन पिढ्या नगराध्यक्षपद भुषविलेल्या व आपल्या पत्नीलाही हि संधी मिळालेली असताना अशा जबाबदार व्यक्तीकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा करणे कोणाही अधिकारी व सामान्य कर्मचारी व सामान्य नागरिकाने केली असल्यास त्यास वावगे म्हणता येणार नाही.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष संजय सातभाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपल्या घराचे बांधकाम सुरु असून त्याला वाळूची कमतरता असल्याने अधिकृत रित्या वाळू परवाना घेण्यासाठी आपण गेलो होतो.त्या वेळी दरवाजात अधिकारी “कार्यमग्न” असल्याचे सांगण्यास कोणीही नसल्याने आपण कार्यलयात थेट प्रवेश केला त्याचा तहसीलदार त्यांना राग आला व त्यांनी,”तुम्ही बाहेर जा,तुम्हाला कोणी मध्ये सोडले” असे म्हणून आपला अवमान केल्याने हि घटना घडल्याचे मोकळ्या मनाने सांगितले आहे. व आपल्याला तसे माहिती असते तर आपण कार्यालयात प्रवेश केला नसता” अशी पुष्टी जोडली आहे.

तहसीलदार योगेश चंद्रे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून एक महत्वपूर्ण दूरध्वनी आला व तो उच्च न्यायालयाशी संबंधित कामाचा असल्याने “ते” काम तातडीने करायचे आदेश सोबतीला द्यायला ते विसरले नाही.त्यामुळे त्यांनी भेटीस येणाऱ्या अभ्यागतांना भेटण्यास दहा ते पंधरा मिनिटे थांबविण्यास दारावरील कर्मचारी बाळासाहेब फरताळे यांना सांगितले.फरताळे यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला असताना नेमके हे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष महोदय आले.त्यांनी दाराजवळ कोणीही कर्मचारी नसल्याने त्यांनी थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न केला व तेथे ते गेलेही व तहसीलदारांशी बोलायचं प्रयत्न केला असता असता परिणाम असा झाला कि,तेथील अधिकारी आपल्या कामात व्यग्र असल्याने ते त्यांना वेळ देऊ शकले नाही. व त्यांनी त्याना “बाहेर जाण्यास फर्मावले” याचा या महोदयांना भलताच राग आला व त्यांनी या अधिकाऱ्यांना अद्वताद्वा बोलण्यास प्रारंभ केला.त्यातून या दोघात आकांड-तांडव झाले.असे बोलले जात असून त्यातून जाताना हे महाशय,” तुमच्याकडे पाहून घेतो” असा दमच भरला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.यातून या महाशयांचे नेमके काम होते याचा उलगडा तहसीलदार याना झाला नसल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close