कोपरगाव तालुका
..या गो-शाळेला विकास कामांसाठी १० लाख निधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील गो-शाळेत विविध विकासकामे करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या १० लाख रुपये निधीचे पत्र गोशाळा चालक व कोकमठाण ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे.
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे,संपन्नतेचे,मांगल्याचे प्रतीक आहे.हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण),गोमूत्र(गाईचे मूत्र),गाईचे दूध,दही,तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे.त्यात गाईचे स्थान उच्च आहे.देशी गाय आज संकरित व जर्शी गायींमुळे दुर्लक्षित झाली आहे.त्यामुळे त्यांचा वंश वाचविण्याचे काम गो-शाळेतून केले जाते कोकमठाण याठिकाणी अशीच एक गोशाळा सुरु असून त्याची दखल आ.काळेंनी घेतली आहे.
कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे गोकुळधाम हि मोठी गो-शाळा आहे.या गो-शाळेत जवळपास २०० लहान-मोठ्या गायी आहेत.गो-शाळेत गायींची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असून अधिक सोयी-सुविधा निर्माण व्हाव्या व ही गो-शाळा आदर्श गो-शाळा व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांना आ.आशुतोष काळे यांनी १० लाख रुपये निधी दिला आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,डॉ.अमोल अजमेरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,रमेश गवळी,अमित जैन,आनंद पहाडे,आनंद दगडे,अमोल काले,प्रविण पाटणी,शैलेश ठोळे,दिपक रोहोम,एकनाथ दुशिंग,सुनील लोंढे,महेश लोंढे,संजय थोरात,पंकज लोंढे,अनंत रक्ताटे,शरद फटांगरे,संतोष लोंढे,संदीप अजमेरे,यश लोहाडे, शेखर अजमेरे,परेश ठोळे,पियुष गंगवाल,सचिन पहाडे,अक्षय लोहाडे,आदी समाज बांधव उपस्थित होते.