कोपरगाव तालुका
छत्रपती पतसंस्थेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी घारे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंसंस्थेच्या वतीने अल्पशा आजाराने निधन झालेले कोळपेवाडी येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब घारे यांच्या कुटूंबियांना त्यांच्या कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील निवासस्थानी सुमारे १६.५० लाखांचा धनादेश सुपूर्त केला आहे.पतसंस्थेच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
शहापूर येथील ग्रामविकास अधिकारी स्व.घारे यांच्या कुटुंबास कुटुंब आधार रुपये ५ लाखांचा धनादेश,शेअर्स ठेव १ लाख ४६ हजार ७०० रुपये धनादेशाने परत,तर मुदत ठेव-२ लाख रुपयांची पावती,तर रुपये ८ लाख ४००रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.असा एकूण त्यांच्या कुटुंबाला १६ लाख ४७ हजार १०० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.कुटुंब आधार त्यांच्या पत्नी सुमनताई घारे व त्यांच्या वारस अंकुश घारे,रवींद्र घारे आदी मुलांच्या हातात धनादेश व पावती मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली आहे.
कोळपेवाडी येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी स्व.भाऊसाहेब घारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्यांच्या पच्छात पत्नी दोन मुले,दोन भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान त्यांच्या निधनाची दखल ग्रामसेवकांची पतसंस्था असलेली छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंसंस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.
त्यात कुटुंब आधार रुपये ५ लाखांचा धनादेश,शेअर्स ठेव १ लाख ४६ हजार ७०० रुपये धनादेशाने परत,तर मुदत ठेव-२ लाख रुपयांची पावती,तर रुपये ८ लाख ४००रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.असा एकूण त्यांच्या कुटुंबाला १६ लाख ४७ हजार १०० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
कुटुंब आधार त्यांच्या पत्नी सुमनताई घारे व त्यांच्या वारस अंकुश घारे,रवींद्र घारे आदी मुलांच्या हातात धनादेश व पावती मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली आहे.
सदर प्रसंगी जिल्हा ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष कुंडलीकराव भगत,कार्याध्यक्ष संभाजी राजे निमसे,संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे,संचालक राजेंद्र बागले,डी.बी.शिंदे,ग्रामसेवक संघाचे तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ शेळके,बी.एम.गुंड, शिवाजी मगर,सुधाकर पगारे,जालिंदर पाडेकर,संदीप माळी,पारनेर कृषी तांत्रिक संघटना अध्यक्ष बाजीराव पवार,संघटक,सुनील राजपूत,शहापूर येथील सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष रामनाथ घारे,वाल्मिक घारे आदी मान्यवर उपस्थित होते.घारे कुटुंबीयांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.