कोपरगाव तालुका
पोहेगावात सर्वरोग निदान शिबिर

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार कै.के.बी.रोहमारे यांच्या २३ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी, माजी विद्यार्थी संघ व के.जे.सोमैया महाविद्यालय तथा लायन्स क्लब, बॅडमिंटन असोसिएशन,कोपरगाव तसेच मयुरेश्वर मंदिर ट्रस्ट आणि के.बी.रोहमारे सहकारी दुध उत्पादक संस्था, पोहेगांव व डॉ. मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कोपरगाव यांच्या सहकार्याने मोफत भव्य सर्वरोगनिदान, रक्तदान शिबीर व कोव्हिड १९ लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन येत्या ५”डिसेंबर रोजी पोहेगावात आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. ०५ डिसेंबर रोजी सकाळी. ९.३० ते दुपारी दु. २.०० या वेळेत वक्रतुंड मंगल कार्यालय, पोहेगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी दिली आहे.
या शिबीरात नेत्ररोगतज्ञ डॉ.प्राजक्ता एस.मुळे, बालरोगतज्ञ डॉ.प्रियंका एस. मुळे, ह्दयरोग तज्ञ डॉ. संकेत डी. मुळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.योगेश एच.लाडे,अस्तीरोग तज्ञ डॉ. संजय उंबरकर तसेच दंतचिकित्सक डॉ. निलेश गायकवाड इ. मान्यवर व विभिन्न विषयातील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहे.
या शिबीरा दरम्यान प्रवरा मेडीकल ट्रस्ट,प्रवरानगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे तसेच प्राथामिक आरोग्य केंद्र, पोहेगाव यांचे सहकार्याने कोव्हिड १९ लसीकरण कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी व आयोजक संस्थांच्या सर्व प्रमुखांनी सांगितले. या शिबीरात नेत्रतपासणी अंतर्गत मोतीबिंदू, फाचबिंदू, तिरळेपणा, लासूर, रांजणवाडी तसेच हृदयरोग तपासणी अंतर्गत हृदयविकार,मेंदूविकार,मधुमेह,छातीचे विकार व अस्थिरोग तपासणीअंतर्गत सांधेतपासणी, संधीवात, स्त्रीरोग तपाणीअंतर्गत गर्भपिशवीचे आजार, पाळीचा त्रास, गर्भाशयाच्या गाठी आदी दंतचिकित्सा अंतर्गत दातदुखी, दात किडणे,अर्धवट ओठ व टाळूत छिद्र आणि बालकांच्या आजाराअंतर्गत बालकांचे सर्व आजार व लसीकरण इ. रोगांची मोफत तपासणी केली जाऊन त्यावर औषधोपचार सुचविले जाणार आहेत.