जाहिरात-9423439946
शैक्षणिक

मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनास उपस्थित रहा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंद विदयालयांत गुरुवार दि.३ नोव्हेंबर रोजी कोपरगांव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न झाली असून या मध्ये अ.नगर येथे संपन्न होणाऱ्या ६१ व्या मुख्याध्यापक संघ च्या राज्य अधिवेशनाला कोपरगांव तालुका व शहरातील प्राचार्य,मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे आणि अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव लावरे यांनी नुकतेच केले आहे.

या सहविचार सभेत सर्वाचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले आहे.सर्वानी राज्य अधिवेशनास उपस्थित रहावे आपल्या संघटनेचे ताकद दाखुन द्यावी असे मत मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांनी मांडले.नवीन मुख्याध्यापक म्हणुन काम करतांना खुप अडचण होते त्या साठी अशी अधिवेशनात सर्वानी सहभागी झाले पाहीजे असे विचार मुख्याध्यापिका सुनिता पारे यांनी मांडले आहे.

या सहविचार सभेला जिल्हा व तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व विविध शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close