गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून इसम गायब,पोलिसांत नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले इसम ठकाजी बकाजी आहेर (वय-६५) हे नुकतेच आपल्या घरच्या नातेवाईकांना,” चहा पिऊन येतो” असे सांगून गेले ते परत आलेच नाही त्यांच्या जवळचे नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ते मिळून आले नाही त्यामुळे खबर देणार बहीण राहिबाई बकाजी आहेर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सदर गायब इसमाचा त्याचा रंग सावळा असून त्यांच्या अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट,पांढरी हाफ पॅन्ट,चेहरा उभट,डोक्यावर गांधी टोपी केस पांढरे बारीक एक डोळा बारीक असे वर्णन आहे.कोणाला वरील वर्णनाचा इसम आढळल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाणे फोन क्रं.०२४२३-२२२२३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव तालुका पोलिसांनी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला राहिबाई आहेर (वय-६०) या हरविलेले इसम यांच्या भगिनी आहेत.त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण करंजी येथील घरी आपले भाऊ असे दोघेच राहत होतो.त्यांचा फरार भाऊ ठकाजी आहेर यास मुलबाळ नसल्याने तो मनोरुग्ण आहे.
दि.२० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपण घरी असताना माझा गायब भाऊ म्हणाला की,”मी गावातून चहा पीऊन येतो” असे म्हणून तो निघून गेला तो परत आला नाही.म्हणून आपण आपले नातेवाईक लक्ष्मण गंगाधर नेहे,उत्तम पुंजाबा ढेपले दोन्ही रा.करंजी याना सांगितले व त्यांनी त्यांचे नातेवाईक व आजूबाजूचे गावात त्यांचा शोध घेतला असता तो मिळून आले नाही.अखेर आम्ही कंटाळून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर देण्यास आलो आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी हरविल्याचे नोंदणी पुस्तक क्रं.६४/२०२२ अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.