कोपरगाव तालुका
वक्तृत्व हि अभ्यासातून व्यक्त होण्याची कला-आ. कानडे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
समाजात माणसाला अनेक विरोधाभासाला सामोरे जावे लागत असते त्यात वक्तृत्व हे अभ्यासाने विकसित करता येते म्हणून वाचन संस्कृतीला जोपासून धाडसाने चांगले विचार व्यक्त करण्याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व आ. लहू कानडे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात सुशीलाबाई काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ आयोजित दोन दिवसीय भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे हे होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या सुकन्या लताताई शिंदे, प्रसिध्द उद्योगपती सुनील जगताप,अनिल शिंदे,संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, कृष्णापंत खडांगळे,सतीश बोर्डे, विष्णू पाडेकर, नितीन शिंदे, परीक्षक डॉ.सुधाकर शेलार, डॉ.निर्मला कुलकर्णी, डॉ.द.के. गंधारे, उपप्राचार्य प्रा.आर.एस.झरेकर, डॉ.आर.जी.पवार,डॉ.व्ही.बी.निकम,प्रा.डी.डी.सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक वसंत पवार, विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक,त्यांचे स्पर्धक-संघ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड.भगीरथ शिंदे यांनी “नवीन पिढी फार अभ्यासू असल्याने त्यांना रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राला दिलेले मौलिक विचार माहित आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील,यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,शरद पवार यांच्या विचारांना अनुसरून काळे व कोल्हे आदीं नेत्यांच्या योगदानाची तरुणांना जाणीव आहे. सुशीलाबाई यांचा शंकररावजी काळे यांच्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय योगदानात मोलाचा वाटा असल्याने माईंचे व्यक्तित्व व कृतीत्व युवकांना सतत प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन केले आहे.
या प्रसंगी सुनील जगताप,लताताई शिंदे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.छाया शिंदे,चित्रा करडे व प्रा.प्रकाश सावंत, यांनी केले. तर मान्यवरांचे आभार डॉ.सुरेश काळे यांनी मानले.