कोपरगाव तालुका
शिक्षक अशोक भालेराव सेवानिवृत्त,ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दगडू भालेराव हे नूकतेच आपली सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झाले असून त्यांचा नुकताच ग्रामस्थांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अशोक जाधव हे होते.
त्या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल बंद्रे,श्री.म्हस्के, धामोरी शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब शिंदे ,किशोर जाधव,सुनील बंद्रे , गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री पवार गुरुजी, नितीन लवारे,रामभाऊ बंद्रे,श्री भवरे सर, सोमनाथ डफाळ,गावातील नागरिक व शाळेतील सहकारी शिक्षक विनोद सोनवणे,शशिकांत माळी, सुरेश रणदिवे, अशोक शिंगाडे, संजय दातीर, हिम्मतराव महाले, राहुल घोडे,आदींसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.त्यावेळी विद्यार्थी सहकारी शिक्षक, गावातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थी व सहकार्यांचे अश्रू अनावर झाले. व कुटुंबासह मुलगा, पत्नी व श्री.भालेराव यांचा उपस्थितांनी पुष्पहार, भेटवस्तू देवून सत्कार केला. शाळेतील विद्यार्थिनी कु.संस्कृती गुंजाळ, कु. जागृती बंद्रे यांच्या मनोगताने सर्वच भावनिक झाले.
श्री.भालेराव यांनी त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तयावेळी त्यांनी “आपली सेवा पूर्ण करून निरोप घेताना काहीतरी मागे सुटल्याची उणीव मनात राहून जाते असे भावोउद्गार काढले.