जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करावा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

ना. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अहमदनगर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विविध समस्या मांडल्या. त्याचबरोबर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी देखील केली. कोपरगाव नगरपरिषदेचे एकूण ५ प्रभाग हे एससी. एसटी. या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १,७,८,१० व १४ या प्रभागांचा समावेश आहे. तसेच त्या व्यतिरिक्त कोपरगाव शहरात देखील एससी. एसटी. प्रवर्गातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पालक मंत्री ना.मुश्रीफ यांच्याकडे केली. त्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.अशी माहिती आ. काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close