कोपरगाव तालुका
कोपरगावात ग्राहकांनी आॕनलाईन खरेदी टाळावी-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गेल्या काहि महिन्यापासुन कोरोनामुळे कोपरगावची बाजारपेठ अनेक चढउतारातुन जात आहे.त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दिवाळी सणाची खरेदी आॕनलाईन न करता कोपरगाव शहरातील बाजारपेठेतुनच करावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.
कोपरगावसह राहाता,संगमनेर,वैजापूर,येवला,सिन्नर आदी नजीच्या सर्व तालुक्यात बाजारपेठांनी मोठे स्वरूप धारण केले असताना कोपरगाव शहरातील व्यापार मात्र दिवसेंदिवस लयाला जात आहे.याला कारण नेमके काय आहे.याबाबत विचारमंथन व्हायला हवे आहे.मात्र याबाबत सर्वच राजकीय पक्षाचे नेते मूग गिळून गप्प बसणे पसंत करत असल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या पार्श्वभूमीवर कदम यांच्या मागणीला महत्व आले आहे.
कदम यांनी दिलेल्या लेखी पञकात म्हटले आहेत की,”शहरातील बाजारपेठ ठप्प झाली होती. लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे,भाजीविक्रेता तसेच हातावर पोट भरणा-या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती.या परिस्थितीत अनेक मजुर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते आजही तीच परिस्थिती बघण्यास मिळत आहे.
या कठीण प्रसंगात कोपरगाव तालुका व्यपारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्था यांनी टाळेबंदीच्या काळात सुमारे दोन ते तीन महिने पुरेल असा किराणा सामान दिले त्याच बरोबर गरजु लोकांना मोफत घरपोच जेवण दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व तालुक्यातील बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडुन येणाऱ्या सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणाची आवश्यक वस्तुंची खरेदी करावी. शहरात कोरोनाकाळात सामाजिक दायित्व निभावणा-या शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांना सहकार्य करुन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन कदम यांनी शेवटी केले आहे.