जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

काँग्रेसची नगरपरिषद निवडणूक पूर्व बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.लहु कानडे,जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच काँग्रेसची बैठक पार पडली आहे.

सदर बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुका बाबत आढावा घेण्यात आला आहे.या वेळेस बैठकीत ज्ञानेश्वर भगत पाटील व विजय जाधव तालुकाध्यक्ष कोपरगाव काँग्रेस सेवादल व किसान सेल निवड करण्यात आली आहे.सदर निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर भगत पाटील यांचा ना.बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त सचिन गुजर,डाॅ.एकनाथराव गोंदकर जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,कोपरगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे,जिल्हा युवक उपाध्यक्ष तुषार पोटे,किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय जाधव,सुनील साळुंके,कोपरगाव शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे,उपाध्यक्ष विष्णु पाडेकर,कोपरगांव काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ‌अॅड शीतल देशमुख,सचिव चंद्रहार जगताप,राहुल गवळी, विलास गव्हाळे,तालुका काँग्रेसचे सरचिटणीस,आकाश नांगरे,चंद्रकांत बागुल तालुकाध्यक्ष (अ.ज.वि) विभाग सहसचिव बाजीराव सोनवणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुका बाबत आढावा घेण्यात आला आहे.या वेळेस बैठकीत ज्ञानेश्वर भगत पाटील व विजय जाधव तालुकाध्यक्ष कोपरगाव काँग्रेस सेवादल व किसान सेल निवड करण्यात आली आहे.सदर निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर भगत पाटील यांचा ना.बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

उपस्थितांचे स्वागत कोपरगाव काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन महसूलमंत्री ना.थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,डॉ.गोंदकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार जिल्हा युवक उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close