जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सर,कान्हेगावच्या कन्या होणार न्यायाधीश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांची कन्या कुमारी संवत्सर परिसरातील एकेकाळचे गाजलेले राजकीय नेते कै. भास्करराव काळे यांची नात अश्विनी काळे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून कान्हेगाव येथील प्रियांका काजळे हि या परीक्षेत यशस्वी रित्या उत्तीर्ण झाली असून या दोन्ही गावच्या कन्या आता मुंबई येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर न्यायाधीश होणार आहे.

राज्यात दिवाणी न्यायाधीश परीक्षेत १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात कुमारी अश्विनी काळे ही ९ व्या स्थानावर राहिली आहे. तिने यापूर्वी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात एल. एल. एम. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. तिचे प्राथमिक शिक्षण जंगली महाराज आश्रम ,अकरावी बारावी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव तर कायदेविषयक शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शिवाजी शिक्षण महाविद्यालय पुणे येथे झाले. तिला प्राध्यापक गणेश शिरसाठ, अक्षय ईनामके, वडील संजय काळे, आई माधुरी काळे, औरंगाबाद खंडपीठात असलेले भाऊ नावाजलेले सुप्रसिध्द कायदेतज्ञ अजिंक्य काळे यांचे मार्गदर्शन लाभले. वकिलीचे शिक्षण घेत असताना तिने पुणे मराठवाडा मित्र मंडळ शिवाजी महाविद्यालयात मुलांना शिक्षणाचे ज्ञान दिले.

कोपरगाव ची प्रियंका काजळे ही मुलगी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोपरगाव न्यायालयात वकिली करत दिवाणी न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.यापूर्वी सांगवी भुसारच्या साधना जाधव या देखील न्यायाधीश झालेल्या आहेत.मुलींनी कायदे शिक्षणात कोपरगाव चा नावलौकिक राज्याचा स्तरावर नेऊन ठेवला आहे.साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव च्या वतीने तिचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, मनोहर कृष्णानी, माजी नगरसेवक संजय जगताप,अड्.एम.पी येवले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close