कोपरगाव तालुका
..’या’ कंपनीचे मका बियाणे अधिक लाभदायक-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीकर कंपनीचे मका बियाणे अधिक लाभदायक व उत्पन्न देणारे असल्याने या वाणाचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपले हेक्टरी उत्पन्न वाढवावे असे आवाहन संवत्सर येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव गायकवाड यांनी एका कार्यक्रमा निमित्त केले आहे.
“श्रीकर गुगुल ३५५५” हा वाण चांगला असून लांबीला मोठा आहे.कंणसाची लांबी जवळपास एक फूट असून ते भरीव आहे.त्यात किमान अठरा ते कमाल वीस ओळी आहे.यात श्रीकर बाजरी,श्रीकर मका-२७२७ सायरा,श्रीकर लामा,या प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे अधिक उत्पन्नासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब केला तर उत्पादनात वाढ होऊन ते कमाल ४० ते ४५ क्विंटल पर्यंत जाते”-शिवाजीराव गायकवाड,प्रगतिशील शेतकरी,संवत्सर,ता.कोपरगाव.
श्रीकर हि आंध्र प्रदेश राज्यातील हैद्राबाद येथील प्रसिद्ध बियाणे कंपनी आहे.त्यांनी या खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गायकवाड यांचे शेतात मका प्रात्यक्षिक घेतले आहे.त्या मका पिकाची पाहणी नुकतीच या कंपनीचे पर्यवेक्षक योगेश सुरेश चन्ने यांनी केली आहे.त्यावेळी ते अनुभवाधारीत उपस्थित शेतकऱ्यांना आपला अनुभव सांगत होते.
सदर प्रसंगी माजी उपसरपंच केशवराव भाकरे,ज्ञानदेव कासार,बाळासाहेब दहे,बाळासाहेब रोहोम,बापू शिंदे,सुभाष लोखंडे,नंदू नरोडे,बंडू बढे,बाबुराव मैन्द, आयुब पठाण,सुरेश सदाशिव,लिकायत पठाण,भिकन बजाज,शिवाजी साळवे,संजय खरात,राहुल उगले,सोनू दाभाडे,दत्तात्रय परजणे,चारुदत्त गायकवाड,ऋषिकेश गायकवाड,राजेंद्र भाकरे,ओंकार गायकवाड,दिलीप भालेराव,शाम काकडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”श्रीकर गुगुल ३५५५” हा वाण चांगला असून लांबीला मोठा आहे.कंणसाची लांबी जवळपास एक फूट असून ते भरीव आहे.त्यात किमान अठरा ते कमाल वीस ओळी आहे.यात श्रीकर बाजरी,श्रीकर मका-२७२७ सायरा,श्रीकर लामा,या प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे अधिक उत्पन्नासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब केला तर उत्पादनात वाढ होऊन ते कमाल ४० ते ४५ क्विंटल पर्यंत जाते यात उन्हाळी व पावसाळी असे दोन्ही वाण उपलब्ध आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी शिवाजीराव गायकवाड,रमेश गायकवाड यांचा कंपनीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.