कोपरगाव तालुका
लसीकरण केलेल्या साई भक्तांना दर्शनास प्राधान्य द्या-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साई मंदीर ७ ऑक्टोबर पासून दर्शनासाठी खूले होणार जिल्ह्यात कोरोना पुन्हा जोर पकडू लागला. ज्या गावात दहा रूग्ण आढळतील त्या गावावर लॉकडाऊन चे सावट घोंगावते.जनता मास्क वापरताना हलगर्जी पणा करत आहे.त्यात दर्शन नियमावलीत साईबाबा संस्थानने लसिकरण केलेल्या भक्तांना प्राधान्य दिलेले नाही.संस्थानने नियमावळीत सुधारणा करावी असे आवाहन माहिती अधिअकार कार्यकर्ते संजय काळे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“सरकारने शिर्डीसह राज्यातील मंदिरे खुले करण्याचा निर्णय नुकताच घेतले आहे.त्याबद्दल भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.तथापि ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाच शिर्डीत व मंदीरात प्रवेश जेण्यात यावा.तसे न केल्यास शिर्डी हे कोरोना प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकते”-संजय काळे.माहिती अधिकार कार्यकर्ते.
सरकारने शिर्डीसह राज्यातील मंदिरे खुले करण्याचा निर्णय नुकताच घेतले आहे.त्याबद्दल भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.तथापि ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाच शिर्डीत व मंदीरात प्रवेश जेण्यात यावा.तसे न केल्यास शिर्डी हे कोरोना प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकते असा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.
गुजरातच्या सिमेवर जर दोन डोस घेतले नसतील तर गुजरात मध्ये प्रवेश नाकारला जातो व दंड आकारला जातो.संस्थानने दोन्ही डोस व ऑनलाईन दर्शन पास वर जास्त भर द्यावा.काही दिवसांसाठी जाग्यावर पास देणे बंद केल्यास शिर्डीत विनाकारण गर्दी उसळणार नाही.तरी प्रशासनाने ऑनलाईन पास अनिवार्य करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी शेवटी केले आहे.