कोपरगाव तालुका
शिर्डी येथे रोटरीच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डी येथील रोटरी क्लब च्या वरीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आकरणाऱ्या मान्यवरांचा नुकताच सत्कार करण्यात आला असून त्यात शिर्डी येथील साईबाबा मूकबधिर विद्यालयाचे संस्थापक माधवराव चौधरी,शिक्षिका श्रीमती.नसरीन इनामदार आदींचा समावेश आहे.
माधवराव चौधरी यांनी अत्यन्त प्रतिकूल काळात मूकबधिर विद्यालयाची स्थापना करून अ नेकांना शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली आहे.तर श्रीमती.नसरीन इनामदार या नगरपालिका शाळा क्रं.५ कोपरगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविले आहेत.विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाइन शिक्षण देऊन तसेच घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले आहे.
शिर्डी येथील रोटरी क्लब आॅफ शिर्डी साईबाबाचे अध्यक्ष रविकिरण डाके यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच मान्यवरांना,”नेशन्स बिल्डर अॅवार्ड”हा पुरस्कार प्रदान केला आहे. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी नगरपंचायतचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर हे होते.
सदर प्रसंगी माजी अध्यक्ष कैलास कोते,सचिन कोते,नगरपंचायत,शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री डोईफोडे,रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा चे अध्यक्ष रविकिरण डाके,तसेच डॉ.पांडुरंग गुंजाळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
माधवराव चौधरी यांनी अत्यन्त प्रतिकूल काळात मूकबधिर विद्यालयाची स्थापना करून अ नेकांना शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली आहे.तर श्रीमती.नसरीन इनामदार या नगरपालिका शाळा क्रं.५ कोपरगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविले आहेत.विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाइन शिक्षण देऊन तसेच घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले.कोरोना काळात त्यांनी केलेल्या विशेष शैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहिले.
रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांचे तर्फे राहाता,कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांना पुरस्कार वितरण करण्यात आले.इनामदार ताईंना नेशन्स बिल्डर अॅवार्ड’ मिळालेबद्दल कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,मोहनिश तुंबारे,प्रशासनाधिकारी तसेच नगरपालिका शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.