कोपरगाव तालुका
कोपरगावातील अवैध कत्तलखाने बंद करा अन्यथा…
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संजयनगर,सुभाषनगर,बैल बाजार रोड इ.भागांत सातत्याने गोवंश हत्त्या चालू आहे.कायद्याने गोवंशहत्या बंदी असूनही दिवसरात्र गोवंश हत्या दिवसाढवळ्या होत आहे.रात्रंदिवस काही घरात सर्रासपणे गायींची कत्तल होऊन नाल्यात रक्त-मांस वहात असते.त्यामुळे हिंदू नागरिकांच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहे.यातून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
“कोपरगाव नगरपरिषदेने जवळजवळ एक कोटी खर्च करून मनाई येथे आधुनिक मशिनरी बसवून अधिकृत कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) उभारून दिले आहे.तेथे म्हैसवर्गीय प्राण्यांची नियमानुसार कत्तल करण्याची परवानगी आहे.असे असतांनाही काही मस्तवाल खाटिक भरवस्तीत गोवंश हत्या करून कायदे धाब्यावर बसवतात.शहरात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावनांची जराही दखल न घेता गोहत्या सुरूच आहे.यावर या समाजातील जेष्ठांनीं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२८ सप्टेंबरच्या सायंकाळी ०६.२५ वाजेच्या सुमारास संजयनगर येथील अपना बेकरी कार्यालयाजवळ अवैध रित्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आपल्या ताब्यातील ठेवत असताना आरोपी मुजाकिर कुरेशी (वय-२२)(पूर्ण नाव उपलब्ध नाही) रा.संजयनगर व दुसरा आरोपी चम्मू हुसेन (वय-१९) रा.संजयनगर हे दोघे आढळून आले असून त्यांची एकूण किंमत ०२ लाख ५९ हजार रुपये असून त्यात १९ मोठ्या गायी व चार लहान वासरे असे १९ गोवंश जातीचे २३ जनावरांचा समावेश होता.कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तथापी घटना स्थळावरून आरोपी फरार झाले आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.या घटनेचे पडसाद अपेक्षे प्रमाणे उमटले असून कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनीच पुढाकार घेऊन याला वाचा फोडली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात पुढे म्हटलें आहे की,मनाई वस्ती संवत्सर येथे नगरपरिषदेने या कत्तल खाण्यासाठी सोया करून दिलेली असताना जाणीवपूर्वक शहराच्या माध्यवस्तीत हा गोरखधंदा तेजीत आला असून येथून थेट संगमनेर मार्गे गुजरात पर्यंत हा बडेका माल पुरवला जात आहे.त्यामुळे शहराची कुप्रसिद्धी सर्वत्र होत आहे.याशिवाय उपनगर संजयनगर येथील अवैध कत्तल खान्यामुळे त्यामुळे शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले दिसते.शहराचे आरोग्य बिघडू नये म्हणून कोपरगाव नगरपरिषदेने जवळजवळ एक कोटी खर्च करून मनाई येथे आधुनिक मशिनरी बसवून अधिकृत कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) उभारून दिले आहे.तेथे म्हैसवर्गीय प्राण्यांची नियमानुसार कत्तल करण्याची परवानगी आहे.असे असतांनाही काही मस्तवाल खाटिक भरवस्तीत गोवंश हत्या करून कायदे धाब्यावर बसवतात.शहरात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावनांची जराही दखल न घेता गोहत्या सुरूच आहे.काही वर्षांपूर्वी याच भागात गोहत्या करणाऱ्या कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर कसायांनी दगडफेक करून घंटागाड्यांची तोडफोड करून दहशत माजविली होती.
शासन-प्रशासनाने अनेकदा कारवाया करूनही या आडदांड प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही.तीन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी शासनाने याच भागांत शेकडो जनावरे (गाई बैल) व कित्येक टन गोमांस जप्त केले,तरीही हे गैरप्रकार थांबत नाहीत.त्यावेळी कोपरगावातील हिंदुनी समजूतदारपणा दाखवून शहरातील वातावरण बिघडू दिले नव्हते.आपले मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरीकांना आवाहन आहे कि,”तुम्ही गोवंश हत्त्या करणाऱ्याना समजावून सांगा.तुम्ही जर हिंदूंच्या भावनांची दखल घेतली नाही तर एखाद्या दिवशी तरी या बेकायदेशीर गोहत्यांमुळे शहरातील वातावरण बिघडू शकते.शहरात हिंदु मुस्लिम समाजात कुठलाही तणाव नाही.शहरातील वातावरण बिघडू नये यासाठी संबंधितांनी-सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.कायदे नियम न पाळता गोवंशहत्या करणाऱ्याना वठणीवर आणले पाहिजे,अन्यथा हिच प्रवृत्ती शहरातील वातावरण,कायदा सुव्यवस्था धोक्यात आणल्याशिवाय रहाणार नाही.याची सर्वांनीच गंभीर दखल घ्यावी असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.