कोपरगाव तालुका
कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
न्यूजसेवा
कोपरगाव(प्रतिनिधी)-
‘रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊ या’या घोष वाक्यासह आज राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
समताचे मार्गदर्शक ओमप्रकाश कोयटे वाढदिवसानिमित्त कोरोना काळातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब ऑफ कोपरगाव,लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष रामदास थोरे यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव,उपकार्याध्यक्ष,सुदर्शन भालेराव,महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी,खजिनदार दादाराव तुपकर,संचालिका.अंजलीताई पाटील व मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे,राजेश ठोळे,संदीप कोयटे,आदीं मान्यवर उपस्थित होते
आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया सुंभ,हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या शिबिरासाठी विविध शैक्षणिक,सामाजिक,राजकीय संघटना व सहकारी संस्थांच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या सत्कार करण्यात आला.समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया यांनी ७५ वेळा रक्तदान केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
शिबीर यशस्वितेसाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे पदाधिकारी राजेश ठोळे,अक्षय गिरमे,अमित लोहाडे, सुमित भट्टड,तसेच लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष आदित्य गुजराथी व पदाधिकारी,कोपरगाव व राहाता येथील लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे,शिवकुमार सोनेकर, शाम जंगम, अमोल राजूरकर व पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे यांनी मानले.