जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..या गावात दोन एकर ऊस जाळला,दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रातिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड ग्रामपंचायत हद्दीत मुर्शतपुर येथील आरोपी सचिन शिवाजी होन व नितीन शिवाजी होन यांनी आपल्या जमिनींतील शेताचे गबाळ हयगईने पेटवून देऊन त्याकडे लक्ष न दिल्याने शेजारच्या शेतकऱ्याचा अडीच लाख रुपयांचा उभा दोन एकर ऊस जाळून खाक झाल्याने देर्डे-कोऱ्हाळें येथील फिर्यादी उत्तम निवृत्ती कडलग (वय-६१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने देर्डे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुर्शतपुर येथील आरोपी सचिन होन व त्यांचा भाऊ नितीन होन हे आपल्या शेतातील अनावश्यक गबाळ व केरकचरा जाळत होते.मात्र त्यांनी हे करताना शेजारी फिर्यादी शेतकरी उत्तम कडलग यांचे ऊस शेत आहे याचा विचार न करता हयगई केली. परिणामस्वरूम शेजारच्या गट क्रमांक १५७ मधील उत्तम कडलग यांच्या शेतातील उसाला आग लागली.व त्यात त्यांचे अडीच एकर उसाचे क्षेत्र जाळून खाक झाला आहे.त्यात त्यांनी उसासाठी वापरलेले ठिबक सिंचन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी उत्तम कडलग व आरोपी सचिन होन यांचे शेतजमीन शेजारी-शेजारी आहे.फिर्यादीचा गट क्रमांक १५७ तर आरोपींचा गट क्रमांक १५६ आहे.दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी सचिन होन व त्यांचा भाऊ नितीन होन हे आपल्या शेतातील अनावश्यक गबाळ व केरकचरा जाळत होते.मात्र त्यांनी हे करताना शेजारी फिर्यादी शेतकरी उत्तम कडलग यांचे ऊस शेत आहे याचा विचार न करता हयगई केली. परिणामस्वरूम शेजारच्या गट क्रमांक १५७ मधील उत्तम कडलग यांच्या शेतातील उसाला आग लागली.व त्यात त्यांचे अडीच एकर उसाचे क्षेत्र जाळून खाक झाला आहे.त्यात त्यांनी उसासाठी वापरलेले ठिबक सिंचन क्षेत्राचे वाटोळे झाले आहे.या दुर्घटनेत त्यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.फिर्यादी उत्तम कडलग यांनी या बाबत सचिन होन व नितीन होन यांची तक्रार गावच्या तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षांकडे करून पाहिली मात्र त्यात तडजोड झाली नाही.अखेर काल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.११०/२०२०,भा.द.वि कलम ४३५,५०४,५०६ अन्वये नितीन व सचिन होन या बंधुवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close