कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील..या गावात पोषण आहार सप्ताह साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी येथील अंगणवाडीत ‘पोषण आहार सप्ताह’नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी वेगवेगळी जीवनसत्त्वे तसेच त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहार याची माहिती देण्यात आली.लहान मुले,गरोदर माता,यांच्या पोषण आहारात कोणत्या कोणत्या भाज्या,पालेभाज्या घ्याव्यात या विषयी माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणजे आहाराबाबतची जागृती.आपल्याकडे कुपोषण म्हणजे फक्त ग्रामीण किंवा आदिवासी भागातील मुले कुपोषित आहेत असे समजले जाते.कुपोषण म्हणजे चुकीचा आहार.आज शहरी मुलांमध्ये दिसणारा लठ्ठपणा म्हणजेही कुपोषणच.या आहाराबाबतच समाजाच्या विविध घटकांमध्ये जागृती करण्यासाठी ‘राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे’ आयोजन केले जाते.
मुख्यत: कडधान्य,पालेभाजी फळभाजी फळे,दैनंदीन सकस आहार या सर्वांच प्रदर्शन देखिल अंगणवाडी मध्ये ठेवण्यात आले करिता अंगणवाडी सेविका रुपाली भवर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच यावेळी सरपंच चांगदेव इंगळे उपसरपंच जयश्री वलटे,आरोग्य सेविका परमल बी. के.,जि.प.शिक्षक मनीषा गोपाळे,अंकुश चव्हाण सर,आशा मनीषा त्रिभुवन व लौकी येथील रवि वलटे,किरण शेळके,सुजित कदम,दीपक कदम तसेच इतर ग्रामस्थ या वेळी अंगणवाडीत उपस्थित होते.