जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवकाळीची नुकसान भरपाई,कोपरगावला पहिला हप्ता जमा-तहसीलदार चंद्रे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते.त्यातून खरिपाची नुकसान भरपाईचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्याची नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली होती राज्य शासनाने त्याची दखल घेऊन तालुक्याला नुकसान भरपाईचा 9 कोटी 28 लाख 8 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

कोपरगांव तालुक्यातील अकाली पावसामुळे बाधित ४० हजार ०२२ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ३२७ हेक्टर नुकसान भरपाईपोटी शासनाकडे एकुण ४२ कोटी रुपये इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार शासनाने कोपरगांव तालुक्यासाठी पहिला हप्ता म्हणून ९.२८ कोटी रुपये अनुदान दिलेले आहे-तहसीलदार योगेश चंद्रे

आँक्टोबर महिन्यामध्ये कोपरगांव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जास्त काळ थैमान घातले होते.त्यातून शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या सोयाबीन,बाजरी,मका व तत्सम खरीप पिकांचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.या बाबत राज्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. शासनाने याची गंभीर दखल घेऊन महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.पंचनामे झाल्या नंतर शासनाकडे कोपरगांव तालुक्यातील बाधित ४० हजार ०२२ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ३२७ हेक्टर नुकसान भरपाईपोटी शासनाकडे एकुण ४२ कोटी रुपये इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार शासनाने कोपरगांव तालुक्यासाठी पहिला हप्ता म्हणून ९.२८ कोटी रुपये अनुदान दिलेले आहे. कोपरगांव तालुक्याला मिळालेल्या अनुदानास अनुसरुन ज्या गावांच्या याद्या बँक खात्या सह प्राप्त झाल्या अशा सर्व म्हणजे एकुण १३६८३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९.२८ कोटी रुपये ८००० रुपये हेक्टर,जिरायत,बागायत धरून व १८००० रु.प्रति हेक्टरी फळ पिकांसाठी याप्रमाणे रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. अजुनही बऱ्याच गावांमध्ये बँक खाते प्राप्त नाही. अशा शेतऱ्यांनी आपले बँक खाते नंबर आपले गांव तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांचे कडे तत्काळ जमा करावेत. कोपरगांव तालुक्यात प्राप्त अनुदान ९.२८ कोटी रुपये संपलेले असून उर्वरित अनुदानासाठी मागणी केलेली आहे. उर्वरित अनुदान प्राप्त होताच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त झाल्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल अशी माहितीही तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close