जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अजित पवार यांच्या हस्ते काळे कारखान्याच्या झेड.एल.डी. प्रकल्पाचे उद्घाटन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
सहकारी साखर कारखानंदारीत अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी विभागाच्या झेड.एल.डी. (डिस्टीलरी स्पेंटवॉश झिरो लिक्वीड डिस्चार्ज) या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, येत्या मंगळवारी दुपारी 3 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी दिली आहे.हा कार्यक्रम माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ. व कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचे मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून हा प्रकल्प उभा करण्यासाठी कारखान्याला मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागली. सदरचे झिरो लिक्वीड डिस्चार्ज (ZLD) मुळे पावसाळ्यात हा प्रकल्प सुरु राहून कारखान्यास देशीमद्य निर्मितीसाठी जास्तीत जास्त स्पिरिटची निर्मिती होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार स्पेंटवॉशची विल्हेवाट लावली जाणार आहे. अशा स्वरुपाची यंत्रणा राज्यातील मोजक्याच कारखान्यांकडे असून त्यात कर्मवीर कारखान्याचा समावेश झाला आहे.

वर्तमानात कारखाना व आसवणी विभागामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून आलेल्या अडचणींवर मात करत कारखाना वाटचाल करीत आहे. आसवनी विभागाची स्पेंटवॉशची विल्हेवाट लावणे हि बाब खूपच डोखेदुखी ठरली होती. स्थानिक शेतकऱ्यांचा व प्रदूषण महामंडळाचा जाच असह्य होता.आसवण विभागातुन ऊसाच्या मळीपासून स्पिरीट निर्मिती केली जाते. स्पिरीट निर्मिती होत असतांना त्यातून निघणाऱ्या स्पेंटवॉशची विल्हेवाट लावणे हे कारखान्यांना अतिशय अडचणीचे ठरलेले आहे. त्याकरिता केंद्रीय पर्यावरण मंडळाने सदरचा स्पेंटवॉश घट्ट करून बॉयलरमध्ये जाळण्यासाठी उपाय सुचविलेले आहे. ज्यामुळे डिस्टीलरीतुन कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. झिरो लिक्वीड डिस्चार्ज मिळेल याकरिता इन्सिरेशन बॉयलर, मल्टीपल इफेक्ट इव्हॅपोरेशन सिस्टीम, कंडेन्सेट पॉलीशिंग युनिटची उभारणी करण्याचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाने दोन वर्षापूर्वी घेतला होता.हा प्रकल्प सुरु झाल्यामुळे आसवनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहून उत्पादन खर्चात बचत होणार आहे. एप्रिल २०१७ पासून या प्रकल्पाचे काम सुरु होऊन हा प्रकल्प आज रोजी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत असून या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, शेतकरी, उद्योग समूहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखाण्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close