कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेत सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अधिकाऱ्यांना सेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्या नंतर अनेक अधिकाऱ्यानी आपल्या बदल्या करून घेण्याचा सपाटा लावला असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या पाठोपाठ नुकतीच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,अग्निशामक अधिकारी संभाजी कार्ले यांचीही बदली झाली असून त्याचा आज कर्मचारी संघटनेच्या वतीने निरोप समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह नगरपरिषद पदाधिकारी,नगरसेवक यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांनीं कोरोना या विषाणूच्या आपत्कालीन व नियमित कालखंडात केलेल्या चोख कामाचे कौतुक केले व आगामी ठिकाणीही असेच काम करून सत्काराला पात्र होण्याचे आवाहन सत्कार मूर्तींना केलं आहे.
कोपरगाव नगर परिषदेत दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून शिवनेनेचे काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बेकायदा जमाव करून,जमाव बंदीचे उल्लंघन करून कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून एका नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यास मारहाण झाली होती,तर या खेरीज नगरपरिषद कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली होती.त्या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.तो पासून नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यात असंतोष खदखदत आहे.अनेकांनी आपली बदली व्हावी या साठी वरिष्ठांकडे बदलीसाठी विनंती अर्ज केले होते.त्यातून आधी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्या नंतर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,अग्निशामक अधिकारी संभाजी कार्ले यांनी बदली झाली आहे.त्यांचा आज निरोप संभारंभ आज सायंकाळी आयोजित केला होता.
सदर प्रसंगी भाजप गटनेते रवींद्र पाठक, संदीप वर्पे,अनिल आव्हाड,आरोग्य सभापती शिवाजी खांडेकर,सत्येन मुंदडा,नगरसेवक मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,अतुल काले, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,राजेंद्र गाडे,आदींसह बहुसंख्य कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांनीं कोरोना या विषाणूच्या आपत्कालीन व नियमित कालखंडात केलेल्या चोख कामाचे कौतुक केले व आगामी ठिकाणीही असेच काम करून सत्काराला पात्र होण्याचे आवाहन सत्कार मूर्तींना केलं आहे.
उपस्थितांना शुभेच्छा नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,संदीप वर्पे,ऋतुजा पाटील,रोहित सोनवणे,रवींद्र वाल्हेकर,श्री मिरीकर,बडगुजर,सुराळकर,लेखाधिकारी तुषार नालकर यांनी दिल्या आहेत.
त्यावेळी बदली झालेले अधिअकारी सुनील गोर्डे,अभियंता दिगंबर वाघ,संभाजी कार्ले यांचा अध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शाल,श्रीफळ,हार देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्तविक कर अधिकारी श्री शिंदे मॅडम यांनी केले तर सूत्र संचलन महारुद्र गालट यांनी केले तर आभार राजेंद्र गाडे यांनी मानले.