कोपरगाव तालुका
यवतमाळ जिल्ह्यातील पतसंस्था अधिकाऱ्यांची ‘समतास’भेट
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकास्थित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे तपासणी अधिकारी अशोक चवळे,शाखा व्यवस्थापक संजय दोरखंडे,कविश्वर शास्रकार,अनिल ठाकरे,लेखापाल वैभव झाडे,लिपिक राजेश दुधलकर,अनिल वगारे आदी पदाधिकाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेस नुकतीच सदिच्छा भेट दिली आहेत्याचा संस्थेचे संचालक.संदीप कोयटे यांनी सत्कार केला आहे.
“महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील समता पतसंस्था प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत ग्राहकांना सेवा देत आहे ही उल्लेखनीय बाब असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पतसंस्था चळवळीत नावारूपाला येणारी महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था आहे”-अशोक चवळे, लेखा परिक्षक,यवतमाळ.
श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे तपासनीस अधिकारी अशोक चवळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,”महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील समता पतसंस्था प्रत्येक विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत ग्राहकांना सेवा देत आहे ही उल्लेखनीय बाब असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी पतसंस्था चळवळीत नावारूपाला येणारी महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था असून सरकारी बँकांनाही लाजवेल असे ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम आणि स्टोर रूम ची संरचना आम्ही आमच्या संस्थेत अंमलात आणण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत.त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे,अशी मनीषा व्यक्त केली.
मुख्य कार्यालयाच्या एच.आर.उज्वला बोरावके यांनी कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली,ऑनलाईन फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम विषयी प्रमुख संजय पारखे यांनी सविस्तर माहिती दिली,संस्थेच्या मुख्य कार्यालयासह विविध शाखांत वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती ई.डी.पी विभाग प्रमुख योगेश आसने यांनी दिली.जितेंद्र अमृतकर यांनी फंड विभागाची माहिती दिली.
प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्थेच्या प्रत्येक विभागास भेट देत विभागाची परिपूर्ण माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेच्या प्रत्येक वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.