शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील..या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ५.५ कोटिंची शिष्यवृत्ती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थी शिष्यवृत्ती) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून या मध्ये आत्मा मालिक माध्य.व उच्च माध्य.गुरुकुल कोकमठाणचे ६१ विदयार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
इयत्ता ८ वी च्या असलेल्या आर्थिकदृष्टया मागास विदयार्थ्यांमधून प्रज्ञावान विदयार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विदयार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करावे या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी,आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्याने आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी हे या योजनेचे उद्धीष्ट आहे.
संपूर्ण राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विदयार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान सलग ननव्या वर्शी आत्मा मालिकने मिळविला आहे. या विदयार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत प्रत्येकी ४८ हजार रुपयांची षिश्यवृत्ती मिळणार आहे.आजपर्यंत आत्मा मालिकच्या १०५३ विदयार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे.अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन, ज्यादा तयारी वर्ग व नियोजनात्मक सराव चाचण्या यांच्या जोडीला विदयार्थी व शिक्षकांची मेहनत या सर्वांमुळेच हे यश मिळाले असल्याचे म्हटले आहे.आम्ही ‘शतप्रतिशत’ हे मिशन वर्षभर राबविले त्या अंतर्गत ठेवलेल उदिष्टे साकार झाले असून आत्मा मालिक हे ‘गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट गुरुकुल’ म्हणुन ओळखले जाते ही ओळख निकालाने कायम राहीली असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगीतले.
यषस्वी विद्यार्थ्यांमध्ये हर्ष पवार,ओमकार शिंदे,गौरव आहेर,ओंकार अरबड,धनंजय नेहरकर, स्वराज मांडे,वैष्णवी गुसरळ,प्रणव पवार,रितेश घुले,भारत अहिरराव,सागर निकम,स्वरांजली येळे, सौरभ उगले,ओमकार खाडे,उज्ज्वल अहिरराव,प्रज्ञा वडघणे,प्रणव संदनशिव,प्रणव गायकवाड, जयेश पवार,चैतन्य म्हसे,सौरभ देवरे,राजगुरु राठोड,मल्हारी शिंगाडे,धिरज जगताप,आदित्य मारकड,ज्ञानराज आडगळे,ओमकार वाणी,सिध्दार्थ साळुंके,सार्थक पाटील,समिक्षा गुरसळ, कार्तिक पगार,रोशन चव्हाण,प्रणव इस्ते,साईशा वेताळ,आयुश सोनवणे,सार्थक गाडेकर,सार्थक थोरे,आसावरी गायकवाड,प्रज्ञा फटांगरे,अर्जुन खरात,नागेश्वर ढाकणे,यश उगले,आदित्य काकड, रक्शिता बाबर,पियुर सोनवणे,सुदर्शन ओव्हळ,हर्षवर्धन दळवी,संकेत निकम,प्रेरणा मोरे,श्रध्दा जाधव,कृष्णा लोहकणे,प्राची गायकवाड,सावरी आफाळे,मानसी खांडवी,आदिराज गायकवाड, राहुल डुमाले,वैष्णवी आव्हाड,कृष्णा वाघ,प्रतिक जायभाये,सुरज सिंगल,नंदिनी पिंपळे
सर्व विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊलीसह,ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त विठ्ठल होन,प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,प्रभाकर जमधडे शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,आदीनी अभिनंदन केले आहे.