जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ. काळेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ,तालुक्यात आनंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

गत महिन्यात संपन्न झालेल्या कोपरगाव विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ. आशुतोष काळे यांनी आज दुपारी विधानसभेत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच त्यांच्या कोपरगाव येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीच्या व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून गुलाल उधळत व फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्तानाट्य दरदिवशी वेगवेगळे वळण घेत होते. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षांनी बहुमतापर्यंत जाण्याइतपत यश मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत कोण बसणार याची राज्यातील प्रत्येक नागरिकाला मागील एक महिन्यापासून उत्सुकता लागून राहिली होती. प्रत्येक दिवशी सत्तांताराचा अंक वेगवेगळे वळण घेत होता.काही नाट्यपूर्ण घडामोडी नंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवार (दि.२८) रोजी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

बुधवारी (दि.२७) रोजी आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देणार असल्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून कोपरगाव मतदार संघात कार्यकर्ते टीव्ही समोर बसलेले होते. नव्या विधानसभेतील आमदारांना हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर (दि.२७) रोजी विधानसभा सदस्यत्वाची शपथ देत होते.यामध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी ज्यावेळी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथील संपर्क कार्यालयात गर्दी करून जल्लोष केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच आशुतोष काळे आमदार झाल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची मतदारांना अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधान पसरले असून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे,प्रतिभा शिलेदार, हिरामण गंगुले, राजेंद्र वाघचौरे, मेहमूद सय्यद, अजीज शेख, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, दिनार कुदळे, दिनकर खरे, रमेश गवळी, डॉ.तुषार गलांडे, मुकुंद इंगळे, राहुल देवळालीकर, संतोष शेलार, रावसाहेब साठे, अशोक खांबेकर, प्रकाश दुशिंग, चंद्रशेखर म्हस्के, प्रा.अंबादास वडांगळे, अशोक खांबेकर, जावेद शेख, वाल्मिक लहिरे, बाळासाहेब रुईकर, सलीम पठाण, संतोष डागा, संदीप सावतडकर, एकनाथ गंगुले, राजेंद्र जोशी, राजेंद्र खैरनार, सचिन गवारे, इम्तियाज अत्तार, अभिजित सरोदे, फिरोज पठाण, तुषार सरोदे, संदीप कपिले, नितीन त्रिभुवन, भाऊसाहेब भाबड, विजय नागरे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close