कोपरगाव तालुका
राज्य भाजपात इतका बेशरम कोण करत आहे?-नगराध्यक्ष वहाडणे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काँग्रेसमधून आलेले,भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह यांची नेमणूक करण्यात आली.मते मिळविण्यासाठी भाजपात इतका बेशरमपणा करण्याचे धाडस कोण व कशामुळे करत आहे ? भाजपाला भंगाराचे गोदाम बनवायचे आहे का ? असा तिखट सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये विचारला आहे.
“राज्य भाजपने आयारामांच्या नादी लागून स्वतःचा इतिहास विसरू नये.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना,”चौकीदार चोर है” असे अनेकदा बोलले गेले तेंव्हा भाजपाचे महाराष्ट्रातील बडे नेते का काही बोलले नाहीत? “स्वतः शेपूट घालून बसायचे व ना.नारायण राणे यांना बोलायला लावायचे हे योग्य नाही”-विजय वहाडणे, नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
भाजपाने आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन परप्रांतीय नागरिकांची मते मिळविण्यासाठी नुकताच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक झालेले व काँग्रेसमधून आलेले तसेच अनेक भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह यांची नेमणूक केली आहे.त्यावरून वादळ उठले आहे.त्यावर कोपरगाव नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी टीका करुन घरचा आहेर दिला आहे.
त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटलं आहे की,”महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यात,सर्वसामान्य जनतेत पोहचविण्यासाठी स्व.उत्तमराव पाटील,वसंतराव भागवत,रामभाऊ म्हाळगी,हशू अडवाणी,सूर्यभान वहाडणे,राम नाईक,राम कापसे,गंगाधर फडणवीस,प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे,डॉ.लेले,भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले.त्यामुळेच अनेकांना सत्ता मिळून काम करण्याची संधी मिळाली,राज्यात-देशात सत्ताही मिळाली.मात्र अलीकडील काळात याचा राज्यातील वर्तमान नेत्यांना विसर पडला आहे.
त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”रा.स्व.संघातून भाजपात आलेले अनेक प्रामाणिक,ध्येयवादी कार्यकर्त्यांना डावलून पक्षात मनमानी सुरू आहे.मतांचे राजकारण फक्त आपल्यालाच कळते असे काही नेत्यांना वाटत असेल.आपण एक छोटासा कार्यकर्ता असून असे सांगू इच्छीतो कि,काहीही करून मतेच मिळवायची असतील तर मुस्लिम मते मिळविण्यासाठी दाऊद इब्राहिमलाही पक्षात घ्यायला काय हरकत आहे? असा तिरका सवाल विचारला आहे.आदर्श व्यक्तिमत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा व रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांची साथ असतांना बाहेरून उसने आणण्याची गरज काय? वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपाची इमारत उभी केली आहे.कृपया या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे करू नका.इतर पक्षातून नेते आयात करता येतील पण प्रामाणिक,एकनिष्ठ कार्यकर्ते मात्र दुरावतील याचे भान ठेवा.आपण या आधीचे मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस यांचेकडे कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी मिळावा म्हणून तीन वेळा प्रस्ताव दिले.पण एका ढबूचीही मदत मिळाली नाही.राज्य भाजपने आयारामांच्या नादी लागून इतिहास विसरू नये.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना,”चौकीदार चोर है” असे अनेकदा बोलले गेले तेंव्हा भाजपाचे महाराष्ट्रातील बडे नेते का काही बोलले नाहीत? “स्वतः शेपूट घालून बसायचे व ना.नारायण राणे यांना बोलायला लावायचे हे योग्य नाही”असा घरचा आहेरही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी राज्यातील नेत्यांना शेवटी दिला आहे.